आवश्यकता भासल्यास अणुकरार रद्द : इराण  | पुढारी

आवश्यकता भासल्यास अणुकरार रद्द : इराण 

तेहरान : पुढारी ऑनलाईन

इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्लाह खोमेनी यांनी २०१५ मध्ये केलेला अणुकरार देशहितासाठी उपयुक्त ठरत नसेल, तर सरकारने रद्दबातल करण्यासाठी तयार राहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. 

अणुकरार हा पर्याय नसून तो फक्त अर्थाने आहे, असे त्यांनी कॅबिनेटच्या बैठकीत बोलताना सांगितले. अर्थातच, हा करार आमच्या हिताचा नसेल तर आम्ही आमच्या मतापर्यंत पोहोचून तो करार बाजूला ठेवला जाईल, असे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर युरोपशी चर्चा सुरुच ठेवली पाहिजे यावर जोर दिला. 

अमेरिकेकडून अणुकराराची मान्यता काढून घेतली असली, तरी युरोप कराराच्या बाजूने आहे. दरम्यान, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बिनशर्त द्विपक्षीय बोलणीसाठी इराणला ऑफर दिली असली तरी त्यांच्याशी कोणतीही चर्चा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते कोणालाही चर्चेसाठी आणू शकतात असा अमेरिकेचा कयास आहे, पण कोणत्याही प्रकारची त्यांच्याशी चर्चा होणार नाही, असे खोमेनी यांनी सांगितले.  

Back to top button