सुमन कुमारी बनली पाकची पहिली हिंदू महिला न्यायाधीश | पुढारी

सुमन कुमारी बनली पाकची पहिली हिंदू महिला न्यायाधीश

इस्लामाबाद : वृत्तसंस्था

पाकिस्तानची पहिली हिंदू महिला न्यायाधीश म्हणून सुमन कुमारी यांची निवड झाली आहे. सुमन कुमारी कम्बर-शाहददकोट येथील रहिवासी असून याच जिल्ह्यात त्या न्यायाधीश म्हणून काम करणार आहेत.

सुमन कुमारी यांनी हैदराबादमध्ये एलएल.बी. केले असून पदव्युत्तर शिक्षण कराचीच्या सजाबिस्ट युनिव्हर्सिटीत घेतले आहे. त्यांचे वडील डॉ. पवनकुमार बोदन म्हणाले, सुमनला कम्बर-शाहददकोटमधील गरिबांना मोफत, कायदेशीर मदत करायची आहे. सुमनची मोठी बहीण सॉफ्टवेअर अभियंता; तर दुसरी बहीण चार्टर्ड अकौंटंट आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि आतिफ अस्लम यांच्या सुमन चाहत्या आहेत. हिंदू समाजातील पहिले न्यायाधीश न्यायमूर्ती राणा भगवंडस 2005 ते 2007 या काळात कार्यकारिणी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी हिंदू सुमारे 2 टक्के असून इस्लामनंतर पाकिस्तानमध्ये हिंदू धर्म हा दुसरा सर्वात मोठा धर्म आहे.

Back to top button