भारतीय हवाई दलाचे विमान आमच्या हद्‍दीत घुसले; पाकचा आरोप | पुढारी

भारतीय हवाई दलाचे विमान आमच्या हद्‍दीत घुसले; पाकचा आरोप

इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन 

जम्‍मू- काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर भारत आणि पाकिस्‍तानमधील संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांच्या सीमेवरील हालचालींमध्येही वाढ झाल्‍याने युध्दसदृष्‍य परिस्‍थिती बनली आहे. अशातच पाकिस्‍तानकडून शस्‍त्रसंधीचे उल्‍लंघन करण्याच्या घटना सुरूच आहेत. या दरम्यान पाकिस्‍तानने भारतीय हवाईदलाच्या विमानाने आंतरराष्‍ट्रीय सीमेचे उल्‍लंघन केल्‍याचा आरोप केला आहे. पाकने म्‍हटले आहे की,आम्‍ही कारवाई केल्‍यानंतर हे भारतीय विमान पुन्हा भारतीय हद्‍दीत निघून गेले. मंगळवारी पाकिस्‍तान सेनेचे प्रवक्‍ते जनरल आसिफ गफूर यांनी ट्‍वीट करत, भारतावर हा आरोप केला आहे. 

भारतावर आरोप केल्‍यानंतर पुन्हा एक ट्‍वीट करत, गफूर यांनी भारतीय हवाई दलाच्या विमानाने मुजफ्‍फराबाद सेक्‍टरमध्ये घुसण्याचा प्रयत्‍न केला. यावेळी आंम्‍ही अटकाव केल्‍यानंतर हे विमान पुन्हा भारतीय हद्‍दीत निघून गेले. यावेळी कोणतेही नुकसान झाले नसल्‍याचे म्‍हटले आहे. दरम्‍यान या घटनेवर भारतीय हवाई दलाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. यावरून असे दिसून येते की, पुलवामाच्या हल्‍ल्‍यानंतर पाकिस्‍तानकडून भारतावर बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत. तसेच भारत हा आपल्‍यावर युध्द लादत असल्‍याचा आरोप करत आहे. हे म्‍हणजे चोराच्या उलट्‍या बोंबा म्‍हणाव्या लागतील. 

दरम्‍यान या आधीही पाकिस्‍तानचे विदेश मंत्री कुरेशी यांनी संयुक्‍त राष्‍ट्राला पत्र लिहून तक्रार केली होती, ज्‍यामध्ये आपल्‍याला शांती पाहिजे आहे, मात्र, भारत आपल्‍यावर युध्द लादण्याचा प्रयत्‍न करत आहे असे म्‍हटले होते.

अधिक वाचा :

► #surgicalstrike2; बदला घेण्यासाठी केला एअर स्ट्राईक!

भारताचा पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला; पाकच्या पत्रकाराचा व्हिडिओ व्हायरल

पुलवामा हल्‍ल्‍याच्या निषेधार्थ रस्‍त्‍यावर बनवला पाकिस्‍तानचा झेंडा

भारताची मोठी कारवाई; एलओसी ओलांडून केला हवाई हल्ला, दहशतवादी तळ उद्‌ध्वस्त

Back to top button