जेव्हा १६ वर्षाची ग्रेटा डोनाल्ड ट्रम्प यांना खुन्नस देते  | पुढारी

जेव्हा १६ वर्षाची ग्रेटा डोनाल्ड ट्रम्प यांना खुन्नस देते 

न्यूयॉर्क : पुढारी ऑनलाईन 

स्विडनची पर्यावरण संवर्धन कार्यकर्ती मुलगी ग्रेटा थुनबर्गने संयुक्त राष्ट्राच्या वातावरण परिषदेत जागतिक नेत्यांना तुमची हिम्मत कशी झाली असे चांगलेच सुनावले. तिने जागभारातील नेत्यांचे वातावरण बदलाच्या बाबतीत करत असेले प्रयत्न फारच तोकडे आहेत इथे फक्त पैशाची चर्चा होत आहे, असे आपल्या भाषणात सांगितले. दरम्यान, वातावरण परिषदेला अनपेक्षित हजेरी लावणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ग्रेटाने चांगलीच खुन्नस दिली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

पृथ्वीवर ग्लोबल वॉर्मिंगची समस्याच नाही असे छाती ठोकपणे सांगणाऱ्या आणि पॅरिस करारातून माघार घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अनपेक्षितरित्या संयुक्त राष्ट्राच्या वातावरण परिषदेला हजेरी लावली त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांचे भाषण ऐकून ते परिषदेतून बाहेर पडले. ते बाहेर पडताना ग्रेटा ही सभागृहात जात होती. त्यावेळी ट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांनी तिला रोखले. ज्यावेळी ट्रम्प बाहेर पडत होते त्यावेळी तिने त्यांच्याकडे खुन्नस देतच पाहिले. तिचे हे चेहऱ्यावरचे हावभाव कॅमेऱ्याने लगेच टिपले आणि ही क्लिप वाऱ्यासारखी सोशल मीडियावर व्हायरल झाली. 

त्यातच ग्रेटाच्या खडसावणारे भाषण ट्विट करुन ट्रम्प यांनी त्याला ‘ती आपले उज्वल आणि चांगले भविष्य पाहून आनंदी झाली असेल. तिला पाहून चांगले वाटले असे खोचक कॅप्शन दिले.’ ट्रम्प यांच्या या ट्विवर नेटकऱ्यांनी कडक प्रतिक्रिया दिल्या आहेत.     

१६ वर्षाच्या ग्रेटाने भावनिक होत संयुक्त राष्ट्रात भाषण केले होते. त्यात ‘मी इथे असणे अपेक्षित नाही. मी समुद्रापार माझ्या शाळेत असायला हवे होते. तरीही तुम्ही सगळे आमच्यासारख्या तरुणांकडे आशेसाठी येत आहात. तुमचे धाडसच कसे झाले.’असे डोळ्यात पाणी आणून म्हणाली. तिने आता जागतिक स्तरावर वातावरण बदलाबाबत उपाययोजना होत आहेत त्या फार तोकड्या आहेत असे मत तिने व्यक्त केले. ती या संयुक्त राष्ट्राच्या वातावरण परिषदेसाठी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या बोटीतून २ आठवड्यांचा प्रवास करून आली आहे. 

Back to top button