पाकमध्ये रेल्वे-बस अपघात; 19 शीख भाविकांचा मृत्यू | पुढारी

पाकमध्ये रेल्वे-बस अपघात; 19 शीख भाविकांचा मृत्यू

कराची : वृत्तसंस्था 

पाकिस्तानातील कराचीजवळ शुक्रवारी दुपारी झालेल्या रेल्वे अपघात दुर्घटनेत 19 शीख भाविकांचा मृत्यू झाला आहे. लाहोरहून शीख भाविकांना घेऊन कराचीकडे जात असलेल्या बसला शाह हुसैन एक्स्प्रेसने जोराची धडक दिली. 

नानकाना साहिबजवळ सुच्चा सौधा रेल्वेक्रॉसिंगजवळ हा अपघात घडला. रेल्वे स्थानकातून शाह हुसैन एक्स्प्रेस सुटत असतानाच बस ड्रायव्हरने रेल्वेलाईन पार करण्याचा प्रयत्न केला. या क्रॉसिंगजवळ प्रवेशद्वार नव्हते. त्यामुळे ड्रायव्हरने बस पुढे रेटली असताना बसला रेल्वेची जोरदार धडक बसली. बसमधील सर्व शीख भाविक नानकाना साहिब येथे दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात घडला. अपघातात 15 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जखमींना रुग्णालयात दाखल केले होते. 

या क्रॉसिंग ठिकाणी प्रवेशद्वार नसल्याने हा अपघात झाल्याचे रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी शोक व्यक्‍त केला आहे. तर, रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

Back to top button