अन्यथा गंभीर परिणाम भोगाल, ‘या’ छोट्या देशाची चीनला धमकी | पुढारी

अन्यथा गंभीर परिणाम भोगाल, ‘या’ छोट्या देशाची चीनला धमकी

मनिला  : पुढारी ऑनलाईन 

कोविड १९ मुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन सर्व देशांच्या निशाण्यावर आला आहे. तसेच पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चीनी सैनिकंनी भारतीय जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर अनेक देशांनी चीनच्या विस्तारवादी धोरणावर टीका केली आहे. आता फिलिपिन्सनेदेखील चीनला डिवचले असून दक्षिण चीन महासागरातील युद्धसराव थांबवण्यास सांगितले आहे. चीनने युद्धसराव न थांबवल्यास त्यांना गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल असा इशारा फिलिपिन्सने दिला आहे.

अधिक  वाचा : भारत, अमेरिकेनंतर आता जपानकडून चीनला झटका देण्याची तयारी सुरु!

चीनची पीपल्स लिबरेशन आर्मीचा (पीएलए) १ जुलैपासून दक्षिण चीन महासागरात पेरासेल बेटांनजीक युद्धसराव सुरू आहे. हा युद्धसराव तत्काळ थांबवावा, असे फिलिपिन्सने सांगितले आहे. जर हा युद्ध सराव थांबला नाही तर चीनला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशी धमकी फिलिपिन्स परराष्ट्र सचिव तियोदोरो लोक्सिन ज्युनियर यांनी दिली आहे. तसेच चीनने आता फिलिपिन्सच्या क्षेत्रावर कब्जा करू नये असेही त्यांनी म्हटले आहे. 

अधिक  वाचा : कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी डब्‍ल्‍यूएचओ चीनमध्ये जाणार!

पीएलए ज्या ठिकाणी युद्धसराव करत आहे त्या ठिकाणी पेरासेलवरून जाणारे पाणी बंद करण्यात आले आहे. हे पाणी व्हिएतनाममधील औषध कंपन्यांसाठी देण्यात येते. तसेच युद्धसरावामुळे सर्व जहाजांना या क्षेत्रात नेव्हिगेट करण्यापासून रोखण्यात येत आहे, असा आरोप फिलिपिन्सने केला आहे. 

काही दिवसांपूर्वी चीनी तटरक्षक जहाजामुळे व्हिएतनामच्या मच्छीमारांची एक बोट बुडाली होती. त्यामध्ये आठ मच्छीमारांचा समावेश होता. त्यानंतर व्हिएतनामने चीनचा निषेध केला होता. त्यावेळी फिलिपिन्सने व्हिएतनामची बाजू घेत चीनवर टीका केली होती.

अधिक  वाचा : नेपाळी पंतप्रधानांवरील संकट सोमवारपर्यंत टळले!

Back to top button