तर व्हाईट हाऊसमधून जबरदस्तीने हद्दपार केले जाईल; ज्यो बायडेन डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भडकले!  | पुढारी

तर व्हाईट हाऊसमधून जबरदस्तीने हद्दपार केले जाईल; ज्यो बायडेन डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भडकले! 

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्या प्रचार विभागाने शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत पराभव स्वीकारण्यास नकार दिल्यास व्हाईट हाऊसमधून जबरदस्तीने हद्दपार केले जाईल असे जोरदार शब्दांत सांगितले आहे. पेनसिल्व्हेनिया आणि जॉर्जियातील निर्णायक आघाडीनंतर ज्यो बायडेन यांनी निवडणुकीच्या निकालांमध्ये व ट्रेंडमध्ये डोनाल्ड ट्रम्पना मागे टाकले आहे. 

ट्रम्प यांनी निवडणूक पराभव स्वीकार करण्यास तयार नसल्याचे म्हटले आहे. निवडणूक चोरी आणि घोटाळ्याचा आरोप करणारे ट्रम्प यांनी आपला नवीन डाव खेळताना सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.  ज्यो बायडेन यांच्या निवडणूक मोहिमेचे प्रवक्ते अँड्र्यू बेट्स म्हणाले की, १९ जुलै रोजी आम्ही म्हणालो होतो त्याप्रमाणे अमेरिकन जनता या निवडणूकीचा निर्णय घेईल.

अमेरिकेचे सयुक्त राज्य सरकार व्हाईट हाऊसमधून गैरवर्तन करणार्‍यांना बाहेर काढण्यास पूर्णपणे सक्षम आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जुलै महिन्यात फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत पराभवानंतर शांततेत सत्ता हस्तांतरण करण्यास नकार दिला होता. रिअल टाईम इलेक्शनच्या निकालानुसार डेमोक्रॅट बहुल भागात दहा हजाराहून अधिक मतांची मोजणी बाकी असूनही रिपब्लिकन-बहुल पेनसिल्व्हेनियामध्ये बायडेन ९ हजार मतांनी आघाडीवर आहेत.

पेनसिल्व्हेनिया आणि त्यांची २० निवडणूक मते ७७ वर्षीय बायडेन यांना अध्यक्षीय निवडणुकीत निश्चित करणाऱ्या २७० मतांचा जादुई आकडा मिळविण्यात मदत करू शकतात. रिपब्लिकन किल्ला असलेल्या जॉर्जियामध्येही ज्यो बायडेन यांनी आघाडी घेतली आहे. तेथे शुक्रवारी फेरमोजणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

 

Back to top button