तामिळनाडूतील युवक युक्रेनच्या सैन्यात भरती, रशियन फौजांविरोधात लढणार | पुढारी

तामिळनाडूतील युवक युक्रेनच्या सैन्यात भरती, रशियन फौजांविरोधात लढणार

कोईम्बतूर : पीटीआय : भारतीय सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न भंगल्यानंतर भारतातील एक 21 वर्षीय युवक आता चक्क युक्रेनच्या सैन्यात दाखल झाला आहे. रशियन फौजांविरोधात युक्रेनकडून हा युवक आता लढणार आहे. सैनिकेश रविचंद्रन असे या युवकाचे नाव असून तो तामिळनाडूतील थुडियालूरजवळचा आहे.

केंद्रीय गुप्तचर यंत्रणेतील अधिकार्‍यांनी या युवकाच्या घरी भेट दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. रविचंद्रन याची माहिती घेण्यासाठी अधिकार्‍यांनी काही दिवसांपूर्वीच त्याच्या घरात चौकशी केली होती.

अमेरिकेकडून लढण्याची होती. इच्छा भारतीय सैन्य दलात सैनिकेश रविचंद्रन याने दोन वेळा भरती होण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, पुरेशी उंची नसल्याने दोन्ही वेळा त्याची निवड होऊ शकली नव्हती. त्यानंतर सैनिकेश याने अमेरिकन वकिलातीतही संपर्क साधून अमेरिकेच्या सैन्य दलात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

इंजिनिअरिंगचा विद्यार्थी

सैनिकेशच्या पालकांना दिलेल्या माहितीनुसार, सैनिकेश हा युद्धग्रस्त युक्रेनमध्ये एअरोस्पेस इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. रशिया-युक्रेन युद्धाला तोंड फुटण्यापूर्वीच त्याला व्हिडीओ गेम डेव्हलप करणार्‍या कंपनीत नोकरीही मिळाली होती. सैनिकेश भारतात येण्यास तयार नसल्यने त्याचा माग काढून त्याला परत भारतात आणावे, असे आवाहन पालकांनी केंद्र सरकारला केले होते.

सैनिकेश हा खार्किव्ह येथे 2018 पासून नॅशनल एअरोस्पेस युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होता. जॉर्जियन नॅशनल लिजनच्या रशियाविरोधात लढणार्‍या स्वयंसेवकांच्या गटात तो सहभागी झाला होता.

Back to top button