Chernobyl Radiation : रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनला ‘चेरनोबिल’च्या रेडिएशनचा धोका! | पुढारी

Chernobyl Radiation : रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनला ‘चेरनोबिल’च्या रेडिएशनचा धोका!

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियन सैन्य हळूहळू युक्रेनचा ताबा घेत आहे. रशियन सैन्याने कीवमध्ये प्रवेश केला आहे. लोकांमध्ये भीती आहे. खाद्यपदार्थांचा तुटवडा आहे. रशियन सैन्याने गुरुवारी निष्क्रीय असणा-या चेरनोबिल अणु प्रकल्प ताब्यात घेतला. येथे अनेक स्फोट झाले आहेत. त्यामुळे या अणुप्रकल्पातील किरणोत्सर्गाची पातळी वाढली आहे (Chernobyl Radiation). युक्रेनच्या न्यूक्लियर एजन्सीने याला दुजोरा दिला आहे.

रशियाने युक्रेनमधील चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्पावर (Chernobyl Radiation) कब्जा केल्यानंतर धोका वाढला आहे. युक्रेनने यावर एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या माहितीनुसार चेरनोबिल अणुऊर्जा प्लांटमधून किरणोत्सर्ग (Chernobyl Radiation) वाढला आहे. सीएनएननुसार, अणुऊर्जा प्रकल्पाच्या अनेक अधिकाऱ्यांना रशियन सैन्याने ओलीस ठेवले आहे. युक्रेनच्या ग्राउंड फोर्सेसच्या कमांडरच्या सल्लागार अॅलोना शेवत्सोवा यांनी फेसबुकवर याबात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधील माहितीनुसार, रशियन सैन्याने पॉवर स्टेशनचा ताबा घेतला आहे आणि कर्मचाऱ्यांना ओलिस बनवले जात आहे.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आज (दि. २५) दुसरा दिवस आहे. आज रशियन सैन्याच्या हल्ल्यांच्या तीव्रतेत लक्षणीय वाढ झाली आहे. युक्रेनची राजधानी कीवमध्ये सकाळपासून मोठे स्फोट ऐकू येत असून शहरावर एकामागून एक क्षेपणास्त्रे हल्ले होत आहेत. लोक घरात लपून बसले आहेत. अणुऊर्जा प्रकल्पाच्या आजूबाजूला स्फोट होत असल्याने या भागातील किरणोत्सर्ग वाढला आहे. युक्रेनच्या न्यूक्लियर एजन्सीनुसार त्यांना त्यांच्या साइटवर किरणोत्सर्गाची पातळी वाढत असल्याचे आढळले आहे, रॉयटर्स या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

गुरुवारी रात्री रशियन सैन्याने युक्रेनच्या चेरनोबिल न्यूक्लियर पॉवर प्लांटजवळ हल्ले केले. येथे अनेक स्फोटही झाले. त्यामुळे या अणुप्रकल्पातील किरणोत्सर्गाची (Chernobyl Radiation) पातळी वाढली आहे. युक्रेनच्या न्यूक्लियर एजन्सीने याला दुजोरा दिला आहे. किरणोत्सर्गाच्या वाढत्या पातळीमुळे या भागात राहणाऱ्या हजारो लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यांना आरोग्याच्या समस्या देखील असू शकतात. दरम्यान, युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने नागरिकांना रशियाच्या लष्करी हालचालींची माहिती ठेवण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर पेट्रोल बॉम्ब फेकले.

किरणोत्सर्गाचे प्रमाण वाढल्याने हजारो लोकांचा जीव धोक्यात आला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी यापूर्वी भीती व्यक्त केली होती की रशियन सैन्य चेरनोबिल अणु प्रकल्प ताब्यात घेऊ शकते. चेरनोबिल आण्विक प्रकल्प युक्रेनची राजधानी कीवपासून १३० किमी अंतरावर आहे. एप्रिल १९८६ मध्ये चेरनोबिल अणु प्रकल्पात येथे जगातील सर्वात घातक आण्विक अपघात झाला होता. या नंतर प्रचंड हाहाकार माजला होता. अनेक अहवालांचा दावा आहे की चेरनोबिल अणु प्रकल्पात सध्या युक्रेन आणि रशियाच्या अणु प्रकल्पातील २२००० पोती अणु कचरा आहे.

युक्रेनच्या आण्विक एजन्सीने शुक्रवारी सांगितले की, ते निष्क्रीय झालेल्या चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्पाच्या जागेवरून किरणोत्सर्गाच्या पातळीत वाढ नोंदवत आहे. एप्रिल १९८६ मध्ये, चेरनोबिल अणु प्रकल्पात जगातील सर्वात प्राणघातक आण्विक दुर्घटना घडली. स्फोटानंतर संपूर्ण युरोपमध्ये किरणोत्सर्ग झाला. हा प्लांट देशाची राजधानी कीवच्या उत्तरेस १३० किलोमीटर अंतरावर आहे. ज्या अणुभट्टीचा स्फोट झाला तो किरणोत्सर्गाची गळती रोखण्यासाठी संरक्षक उपकरणाने झाकण्यात आला आहे आणि संपूर्ण प्लांट अक्षम करण्यात आला आहे.

Back to top button