पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाने युक्रेनवरील सलग दुसऱ्या दिवशी लष्करी कारवाई सुरुच ठेवली आहे. दरम्यान, तोडगा काढण्यासाठी द्विपक्षीय चर्चेसाठी रशियाने म्हटले आहे, मात्र त्यासाठी युक्रेन सैन्याला शस्त्रे खाली ठेवण्याची अट ठेवली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष होलोदीमीर झेलेन्स्की यांनी चर्चेसाठी तयार असल्याचे सांगत रशियाला शस्त्रसंधीचे आवाहन केले आहे.
अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी युक्रेनची राजधानी कीव काही दिवसांमध्येच रशिया काबीज करेल अशी भीती व्यक्त केली आहे. गुप्तचर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन ते चार दिवसांमध्ये रशिया पूर्ण ताबा मिळवण्याची शक्यता आहे.
युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाने चर्चेसाठी सहमती दर्शवली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी रशिया चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे की, युक्रेनचे सैन्याने शस्त्रे खाली ठेवल्यास युद्धाला पूर्णविराम देवून रशिया चर्चेसाठी तयार आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध शिगेला पोहोचले आहे. रशियाने युक्रेनचे मोठे नुकसान केले आहे. जिवितहानी तसेच वित्तहानी वाढत चालल्याने युक्रेन सुद्धा चर्चेची तयारी दाखवली आहे.
हे ही वाचलं का ?