India GDP : युद्ध रशिया आणि युक्रेनमध्ये; पण GDP घसरणार भारताचा | पुढारी

India GDP : युद्ध रशिया आणि युक्रेनमध्ये; पण GDP घसरणार भारताचा

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम जगावर दिसू लागले आहेत. कोरोनाच्या परिणामातून विविध देश आणि बँकांची स्थिती सावरत असताना भूराजकीय स्थितीमुळे निर्माण होत असलेल्या तणावांमुळे पुन्हा एकदा चिंतेत भर पडलेली आहे. NOMURA या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार भारत, फिलिपाईन्स आणि थायलंड या तीन देशांना (ndia GDP) या तणावाचा मोठा फटका बसणार आहे.

भारताला याचा मोठा फटाका बसण्याचे कारण खनिज तेल आहे. भारताचा खनिज तेलासाठीचा दर्जा Net Importer असा आहे. त्यामुळे कच्चा तेलाच्या किंमतीत १० टक्के जरी वाढ झाली तरी भारताचा GDP हा ०.२० पर्सेंटेज पॉईंटने घसरू शकतो असे मत या संस्थेचे आहे. अरूप नंदी आणि सोनल वर्मा या तज्ज्ञांनी हा अहवाल लिहिला आहे.

ग्राहक आणि व्यवसाय दोन्हींना तेलाच्या दरवाढीचा फटका बसणार आहे, असे ते म्हणतात. जरी हा संघर्ष झाला नसता तरीही महागाईच्या वाढत्या निर्देशांकाकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दुलर्क्ष केले होते. पण या वर्षाच्या मध्यापर्यंत वाढती महागाईची (ndia GDP) दखल रिझर्व्ह बँकेला घ्यावी लागेल, जेणे करून जूनमध्ये रेपो दरात १ बीपीएस इतकी वाढ करावी लागेल, असे या संस्थेला वाटते.

रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीने गुरुवारी जाहीर केलेल्या रिपोर्टमध्ये कच्चा तेलाच्या वाढत्या किंमतीवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

पहा व्हिडिओ : रशिया-युक्रेन युद्ध; पुढे काय होणार?

हे वाचलंत का? 

Back to top button