NATO जवळही अणवस्त्रं आहेत, हे रशियाने विसरू नये; फ्रान्सचा इशारा | पुढारी

NATO जवळही अणवस्त्रं आहेत, हे रशियाने विसरू नये; फ्रान्सचा इशारा

पॅरिस, पुढारी ऑनलाईन : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. जागतिक पातळीवर अशीही चिंता सतावते आहे की, येत्या काळात हे युद्ध अणूयुद्धात परिवर्तित होतंय की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री ज्यां यवेस ले ड्रियन यांनी गुरुवारी सांगितले की, “रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांनी जेव्हा अणवस्त्राचा वापर करण्याची धमकी दिली, त्यावेळी त्यांनी हे विसरु नये की, नाटो ही एक आण्विक युती आहे.

राॅयटर्सच्या माहितीनुसार… फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री टेलिव्हिजन टीएफ-१ यावर बोलले की, “मला वाटतं की, व्लादिमीर पुतीन यांना समजायला हवं की, अटलांटिक युती ही एक आण्विक युतीदेखील आहे.” रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वांत मोठा हल्ला मानला जात आहे. तसेच रशियाने युक्रेनच्या ७० हून अधिक ठिकाणांना नष्ट केलेले आहे, असा दावा केलेला आहे.

युक्रेनने गुरुवारी सांगितले की, “रशिया दिवसाच्या सुरुवातीलाच युक्रेनवर २०३ हल्ले केले. त्याचबरोबर देशातील सर्व ठिकाणी लढाई सुरू आहे.” युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धादरम्यान भारतासमोर अनेक अडचणी वाढणार आहेत. युक्रेनमध्ये सुमारे २० हजार भारतीय आहेत. अशा परिस्थितीत त्यांना सुरक्षित बाहेर काढणे, हे भारतासमोरील मोठं आव्हान आहे.

हे वाचलंत का?

Back to top button