गोवा : कुशावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; पारोडा गाव बुडण्याची भीती | पुढारी

गोवा : कुशावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; पारोडा गाव बुडण्याची भीती

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : केपेच्या कुशावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास येत्या पाच तासांत कुशावती नदीच्या पुरामुळे पारोडा गाव बुडण्याची भीती आहे.

साळावली धरणाचे पात्र भरून गेले आहे. त्यामुळे कुशावती आणि जुआरी नद्यांना पूर आलेला आहे. पावसाचा वेग न मंदावल्यास पुराचे पाणी गावात शिरण्याची शक्यता आहे. तसेच मडगाव आणि केपेला जोडणारा गुडी पारोडा रस्ता पाण्याखाली जाण्याची भिती आहे.

अधिक वाचा :

गेल्या अनेक वर्षांपासून पारोडा गाव पाण्यात बुडत आहे. प्रशासनाने याची कधीच गांभीर्याने दखल घेतली नव्हती. त्याचे परिणाम परोडावासीयांना भोगावे लागत आहेत. मंगळवारी दक्षिण गोव्यात पावसाने थैमान घातले. त्यामुळे बुधवारी कुशावती नदीला पूर आला होता.

सकाळी सात वाजता पुराचे पाणी मुख्य पुलाला टेकायला आले होते. त्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरले.

अधिक वाचा :

पाणी पुलापर्यंत पोहोचलेले असताना त्यावरुन प्रवास करणे जिकरीचे बनले होते. जीव धोक्यात घालून पूल ओलांडणे शक्य नसल्याने लोकांनी आमोणावरून केपे जाणे पसंत केले.

दुपारी बाराच्या सुमारास पाणी पुलाला लागले होते. पावसाचा जोर असाच राहिल्यास सायंकाळपर्यंत नदीचे पाणी पारोडा भागात शिरण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा : 

दरम्यान, दक्षिण गोव्याला पाणी पुरवठा करणारे साळावली धरण काल मंगळवारी भरले. साळावली धरणातून पाणी पडू लागल्याने जुवारी नदी सुद्धा भरून वाहू लागली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : आरे कॉलनीतलं गावदेवीचं ही जुनं मंदिर आपण पाहिलंय का?

Back to top button