गोवा : पिसुर्लेतील खाण मातीत सोन्याचा अंश | पुढारी

गोवा : पिसुर्लेतील खाण मातीत सोन्याचा अंश

पणजी; पुढारी वृत्तसेवा : सत्तरी तालुक्यातील पिसुर्लेखाणीवरील खाण मातीमध्ये सोेन्याचा अंश असल्याचा दावा गोवा फाऊंडेशन संघटनेने न्यायालयात केला आहे.

गोवा फाऊंडेशनचे प्रमुख क्‍लाऊड आल्वारिस यांनी दिलेल्या माहितीनुसार पिसुर्ले येथील खाणीवरील डंंपमधील माती आपल्या संघटनेने मुंबई येथील एका प्रयोगशाळेमध्ये पाठविली होती. त्या प्रयोगशाळेच्या अहवालानुलसार प्रति किलो खाण मालात 46.70 मी. ग्रॅम व प्रति टन खाण मालात 46 ग्रॅम सोन्याचा अंश असू शकतो. आपण या विषयी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. कारण सर्वोच्च न्यायालयात यापूर्वीच आपण राज्यातील खाणींच्या डंपच्या लिलावाविरोधात याचिका दाखल केलेली आहे. आपल्या प्रतिज्ञापत्रावर 24 ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आश्‍चर्यकारक दावा : अ‍ॅडव्होकेट जनरल
गोवा फाऊंडेशनने पिसुर्ले येथील खाणीवरील डंपच्या खाण मातीत सोन्याचा अंश असल्याचा जो दावा केला आहे, तो आश्‍चर्यकारक आहे. त्यांनी न्यायालयात याबाबत प्रतिज्ञापत्रही सादर केल्याचे कळते. आम्ही त्यांनी सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास करणार आहोत. राज्य सरकार या विषयावर गंभीरपणे विचार करेल. विशेष तपास यंत्रणा नेमून तेथील खाणमातीचेे पुन्हा परीक्षण केले जाऊ शकते, असे अ‍ॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी सांगितले.

Back to top button