मेकअप करणारे अ‍ॅप  | पुढारी | पुढारी

मेकअप करणारे अ‍ॅप  | पुढारी

फेस इफेक्टशी संबंधित अनेक अ‍ॅप जगभरात लोकप्रिय आहेत. याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. आजवर मेकअप अथवा प्रतिमेवर मनोरंजक इफेक्ट देणारे अ‍ॅप आपण वापरत असाल. मात्र आता मेकअ‍ॅप हे मेकअप नाहीसे करणारे अ‍ॅप तुफान लोकप्रिय झाले आहे. अशा प्रकाराने चित्र-विचित्र इफेक्ट प्रदान केलेल्या प्रतिमा वा व्हिडीओजचे सोशल मीडियातून खूप शेअरिंगही केले जाते. मात्र याच्या अगदी विरूध्द उपयोग असणारे मेकअ‍ॅप हे सध्या जगभरात व्हायरल झाले आहे. यात कोणत्याही प्रतिमेवर असणारा मेकअप काढण्यासाठी आर्टीफिशियल इंटिलेजियन्स  म्हणजेच कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर केला जातो. याच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या प्रतिमांना सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. पहिल्या पाच प्रतिमांवरील मेकअप घालवण्याची या अ‍ॅपवर मोफत सुविधा मिळाली आहे. मात्र यापुढील इमेजेसला 0.99 डॉलर्स इतकी आकारणी करण्यात येत आहे.

मॅकअ‍ॅप हे अ‍ॅप लोकप्रिय झाले असले तरी यामुळे वाद देखील निर्माण झाले आहेत. याच्या माध्यमातून प्रतिमांना काही प्रमाणात वाईट करण्यात येत असल्याचा आरोप बर्‍याच  युजर्सतर्फे करण्यात येत आहे. विशेष करून यात थोड्या प्रमाणात इमेजचा रंग बदलत असल्याचे आणि यातून महिलांचा अवमान होत असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे. मात्र बहुतांश जणांना हा प्रकार भलताच आवडल्याचे दिसून येत आहे. सध्या हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी सादर करण्यात आले आहे. मात्र हे अ‍ॅप विकसित करणार्‍या अशोत गार्बेलेनोव्ह याने मात्र हे अ‍ॅप सध्या तरी प्रयोगात्मक अवस्थेत आहे. यामध्ये आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे जाहीर केले आहे.

अमोल हंकारे, आगळगाव

Back to top button