मुलाखत जिंकायची आहे?; या घ्या खास टिप्स! | पुढारी

मुलाखत जिंकायची आहे?; या घ्या खास टिप्स!

पुढारी ऑनलाईन 

शिक्षण झाले की नोकरीची शोधाशोध सुरू होते. अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले जातात. प्रत्येक ठिकाणी तो स्वीकारला जाईलच असे नाही, पण जेथे स्वीकारतील तेथे पुढचा टप्पा पार करावा लागतो तो मुलाखतीचा. यामध्ये खरा कस लागतो. आपण ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्यातला अभ्यास, त्यासाठी लागणारी आपली कौशल्य यांसह बऱ्याच गोष्टी मुलाखतीमध्ये तपासल्या जातात. त्यातून आपण पदासाठी पात्र आहोत की नाही हे ठरवले जाते. तर पाहुयात अशा मुलाखतीला सामोरे जाण्यासाठी काही टिप्स…

yesज्या पदासाठी अर्ज केला आहे, त्या पदाबाबत थोडीफार का होईना माहिती असली पहिजे.

yesमुलाखतीच्या ठिकाणी वेळेच्या आधी १५ मिनिटे पोहोचावे.

yesमुलाखतीच्या वेळी केबिनमध्ये शिरताना घाईघाईने आत शिरू नका, संयम आणि तोल सांभाळून आत शिरावे. आतमध्ये आल्यास सर्वप्रथम पॅनलमधील सर्व सदस्यांना अभिवादन करावे.

yesआपण ज्यावेळी मुलाखतीला जातो त्यावेळी  समोर बसलेल्या व्यक्तींना पाहुन आपला गोंधळ होतो. पण त्याचवेळी आपल्या गुणांची चाचपणी होत असते, त्यासाठी गोंधळ होण्याचे टाळावे. तसेच घाईघाईने बोलणे टाळावे.

yesसूचना मिळेपर्यंत खुर्चीवर बसू नये. 

yesउमेदवाराचे उत्तर व्यवस्थित, मुद्देसूद आणि आकर्षक असावे. अधिक माहिती देण्याच्या अर्विभावत जाऊ नये.

yesउमेदवाराने नेहमी समोरच्याला सर किंवा मॅडम अशा आदरयुक्त शब्दाने हाक मारावी.

yesमुलाखत चालू असताना खोकला किंवा शिंक आल्यास तोंडासमोर रुमाल ठेवावा.

yesमुलाखत घेणारा हास्यविनोद करीत असल्यास उमेदवाराने सहभागी होऊ नये.

yesमुलाखत देताना अधिकाधिक ज्ञान, क्षमता, कौशल्य सादर करण्याचा प्रयत्न करावा.

yesसमोर बसलेल्या उमेदवाराने नेहमी समोर बसलेल्या मुख्य माणसाला उत्तर द्यावे.

yesकुणीही काहीही बोललं तरी नारजी व्यक्त करू नये.

yesआपल्याला जी योग्य भाषा येते तीच बोलावी. 

yesउत्तर नेहमी खंबीर आणि स्पष्टपणे द्यावे. 

yesमुलाखत घेणाऱ्याचा  थोडाफार स्वभाव ओळखता आला पाहिजे. 

yesमुलाखत देताना समोरच्या व्यक्तींच्या कलेने जावे. त्यांच्या मतांच्या विरूद्ध जाण्यास टाळावे.

yesमहत्त्वाकांक्षी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. प्रामाणिक राहावे.

yesवेगळ्या पद्धतीने विचारलेल्या प्रश्नांनी विचलित होऊ नका. 

yesस्पष्ट व मुद्देसूद उत्तरे द्यावीत. जेणेकरून समोरच्या व्यक्तींचा गोंधळ उडणार नाही. 

yesमुलाखत घेणार्‍यांच्या नजरेला नजर मिळवून बोलावे. अधूनमधून स्मित हास्य करायला विसरू नये.

yesमुलाखतीचा अगोदर सराव करावा.

yesयशस्वी व जिंकण्याची मनोवृत्ती ठेवावी.

yesतुम्हाला सूचना मिळेपर्यंत मुलाखतीचा कक्ष सोडू नये.

yesजाताना आभार मानायला विसरू नका आणि एकदा जाण्यासाठी निघाल्यानंतर मागे वळून पाहू नका.

yesया टिप्स तुम्हाला मुलाखतीमध्ये यश मिळवून देण्यास नक्की उपयोगी ठरतील.

smileyसो ऑल द बेस्ट!

 

Back to top button