आता फेसबुक स्टेटस अपलोड करा तुमच्या आवाजात | पुढारी

आता फेसबुक स्टेटस अपलोड करा तुमच्या आवाजात

नवी दिल्ली : पुढारी ऑलाईन

दिवसेंदिवस कोणत्या कोणत्या सोशल मीडियाचे नवे फीचर लाँच होत आहेत. काहीदिवसांपूर्वीच फेसबुकचे नवे एक फीचर लाँच झाले होते. ‘फेसबुक जॉब’ असे नाव असलेल्या या फिचरच्या माध्यमातून नोकरी शोधणे शक्य होणार आहे. या अनोख्या फिचरनंतर आता फेसबूकने आणखी एक भन्नाट फीचर लाँच केले आहे.
 
आतापर्यंत फेसबुक युझर्सना स्टेटस म्हणून फोटो, व्हिडिओ अपलोड करता येत होते. यापुढे आता त्यांना स्वत:चा आवाज देखील स्टेटस म्हणून ठेवता येणार आहे. या नव्या फिचरमुळे युझर्सना आपल्या आवाजात स्टेटसच्या माध्यमातून भावना व्यक्त करता येणार आहेत. 

ऑडिओ स्टेटस ठेवण्यासाठी फेसबुक ‘एड वॉइज क्लिप’ फीचरवर काम करत आहे. या फिचरमुळे युझर्स ऑडिओ क्लिप स्टेटस म्हणून ठेऊ शकतील. विशेष म्हणजे हे फिचर प्रथम एका भारतीय युझरने पाहिले. भारतातील काही युझर्सच्या फोनवर हे फिचर देण्यात आले आहे. मात्र सर्वांना हे फिचर कधी उपलब्ध होईल याबाबत फेसबुकने कोणतीही माहिती दिलेली नाही. 
   
हे फिचर टेक्स्ट स्टेटस पेक्षा अधिक चांगले ठरेल. युझर्स सहजपणे ऑडिओ स्टेटस ठेऊ शकतील. सध्या टेक्स्ट स्टेटस ठेवावा लागत असल्यामुळे अनेक  युजर्संनी त्याच्या स्टेटसमध्ये काहीच लिहलेले नाही. या ऑडिओ स्टेटसमुळे अनेक लोक स्टेटस ठेवण्याबाबत  पुन्हा अॅक्टीव्ह होतील, असे वृत्त टेकक्रंच या वेबसाईटने दिले आहे. 

फेसबुकमुळे मित्र, नातेवाईक एकमेकांच्या संपर्कात राहतील यासाठी आमचा प्रयत्न असतो. ‘ऑडिओ क्लिप’ हे फिचर यासाठी उपयोगी ठरेल, असे मत फेसबुकच्या प्रवक्त्याने व्यक्त केले.  

येत आहे आणखी एक नवे फिचर…

‘एड वॉइज क्लिप’ फीचर पाठोपाठ फेसबुक आणखी एका नव्या फिचरवर काम करत आहे. ‘फेस रिकॉग्निशन’ असे त्याचे नाव आहे. या फिचरमुळे फोटोला टॅग न करता त्याचे नोटिफिकेशन दिले जाईल. उदा- तुमच्या एखाद्या मित्राने तुमचा फोटो अपलोड करताना तुम्हाला टॅग केले नसले तरी तुमचा फोटो अपलोड झाल्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हे फिचर तुमच्या चेहरा ओळखून फोटो अपलोड झाल्याचे नोटिफिकेशन तुम्हाला देईल.   

Back to top button