‘त्याने’ वापरली नोकरी मिळवण्याची अफलातून आयडिया!  | पुढारी

'त्याने' वापरली नोकरी मिळवण्याची अफलातून आयडिया! 

नवी दिल्‍ली :  पुढारी ऑनलाईन 

अमेरिकेच्या कॅलीफोर्नियातील वेब डेव्हलपर डेव्हिड कासरेजला नोकरी मिळत नसल्‍याने तो निराश होता. अशा कठीण परिस्थितीत डेव्हिडने कंटाळून नोकरी मिळविण्‍यासाठी एक वेगळाच मार्ग वापरला आणि मग काय त्याला एकापेक्षा एक नोकरीच्‍या ऑफर मिळाल्‍या. 

डेव्हिडची गेल्या एका वर्षापासून ना ‘नोकरी’ आणि ना राहायला ‘घर’ अवस्‍था होती. नोकरी कशी मिळवायची यासाठी त्‍यांने एक शक्‍कल लढविली. नोकरी शोधण्‍यासाठी डेव्हिड सिलिकॉन व्‍हॅलीतील रस्‍त्‍याच्‍या कडेला एका बाकावर उभा राहिला. डेव्हिड बाकावर नुसता उभा राहिला नाही तर हातात फलक घेऊन उभा राहिला. आता आपल्‍याला वाटणार हातात बोर्ड घेऊन उभे राहणे यात काय विशेष आहे. पण यातचं विशेष आहे. कारण त्‍याच्‍या हातातील फलकावर ‘बेघर पण यशासाठी भुखेला, कृपया रिज्‍यूम घ्‍या’ असे लिहले  होते. नोकरीच्‍या शोधात डेव्हिडने रस्‍त्‍यावर आपले रिज्‍यूम देण्यास सुरुवात केली. काही लोकांनी त्‍याला भिखारी समजले. पण हातात फलक घेऊन त्याने आपले काम सुरुच ठेवले. 

डेव्हिडचा नोकरी मिळविण्‍यासाठीच्या या प्रयत्नाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्‍हायरल झाला. नोकरी मागण्‍याचा या प्रकारांमुळे लोक त्‍यांच्‍याकडे आकर्षित होऊ लागले. त्‍याचवेळी एका महिलेची नजर त्‍याच्‍यावर गेली. त्‍या महिलेने  रिज्‍यूम सोबत त्‍याचा फोटो ट्‍वीटरवर शेयर करताना लिहले हा तरुण ‘बेघर’ आणि ‘बेरोजगार’ आहे. ‘बेरोजगार’ असताना तो ‘भिक’ न मागता ‘नोकरी’ मागत आहे. सिलीकॉन व्‍हॅलीतील कोणी काही करु शकले तर करा. मग काय सोशल मीडियावर यासाठी ‘गेट डेव्हिड अ जॉब हॅशटॅग’ करुन एक मोहीमच सुरु झाली. त्यानंतर डेव्हिडला  २०० पेक्षा अधिक कंपन्यांनी त्‍याला नोकरीची ऑफर दिली. 

विशेष म्‍हणजे त्‍याचा हा व्‍हायरल फोटो पाहून गुगल व नेटफ्लिक्स कंपनीने   नोकरीची ऑफर दिली. या सगळ्‍यामुळे त्‍याला शेवटी नोकरी मिळाली. 


 

Back to top button