‘नेटफ्लिक्स’ला आव्हान; तब्बल एक कोटी खेचले! | पुढारी

'नेटफ्लिक्स'ला आव्हान; तब्बल एक कोटी खेचले!

ऑनलाईन स्ट्रिमिंगमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘नेटफ्लिक्स’च्या साम्राज्याला चांगलेच आव्हान निर्माण झाले आहे. नेटफ्लिक्सकडे जवळपास १५८.३ दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत.‘नेटफ्लिक्स’ वर ऑनलाईन मालिका आणि चित्रपट पाहिले जातात. 

नेटफ्लिक्सच्या साम्राज्याला आव्हान देण्यासाठी आणखी एक स्ट्रिमिंग अ‍ॅप बाजारात  आले आहे. द वॉल्ड डिस्ने कंपनीने सुरु केलेल्या अ‍ॅपचे नाव ‘डिस्ने प्लस’आहे. द वॉल्ट डिस्ने ही जगातील सर्वात मोठ्या चित्रपट निर्मिती कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. डिस्नेचे शेकडो ऑनलाईन शो याआधी नेटफ्लिक्सवर सुरु होते. परंतु आता त्यांनी स्वत:चे स्ट्रिमिंग अ‍ॅप सुरु केल्यामुळे ते सर्व शो त्यांनी स्वत:च्या अ‍ॅपवर प्रदर्शित करण्यास सुरुवात केली आहे. 

डिस्ने प्लस सुरु झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात नेटफ्लिक्सचे तब्बल १ कोटी १० लाख प्रेक्षक डिस्नेने आपल्या दिशेने खेचले. या नेटकऱ्यांकडून आता नेटफ्लिक्स अ‍ॅप बंद करुन आता डिस्ने पाहण्यास सुरुवात झाली आहे. डिस्नेकडे सध्या १५ दशलक्ष सबस्क्राइबर्स आहेत. येत्या महिन्यात नेटफ्लिक्सला आणखी दणका बसेल अशी माहिती आहे. सध्या अमेरिकेत दोन्ही कंपन्यांमध्ये चांगलीच स्पर्धा सुरु झाली आहे.

Back to top button