अखेर व्हॉट्सॲपला दया आली; खास ग्रुप ॲडमिनसाठी आणले भन्नाट फिचर! | पुढारी

अखेर व्हॉट्सॲपला दया आली; खास ग्रुप ॲडमिनसाठी आणले भन्नाट फिचर!

व्हॉट्स अॅपने वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर आणले आहे. व्हॉट्स अॅपने रोलआउट केलेल्या फिचरचे नाव Dissapearing Message असे आहे. तथापि, व्हॉट्स अॅपने संदेश हटविण्यासाठी या फिचरचे नाव बदलून डिलीट मेसेज असे केले आहे. हे फिचर गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत होते. या फिचरच्या मदतीने निश्चित वेळेत संदेश आपोआप डिलीट होऊ शकतात.

अधिक वाचा :  ‘नेटफ्लिक्स’ला आव्हान; तब्बल एक कोटी खेचले!

हे फिचर सध्या अँड्रॉइड बीटा व्हर्जनवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अँड्रॉइडबरोबरच व्हॉट्सअ‍ॅपचे डिलीट मेसेज फीचर आयओएस बीटा व्हर्जनवरही देण्यात येत आहे. या फिचरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे व्हॉट्स ॲप त्याला क्लिनिंग टूल  म्हणून विकसित करीत आहे. या फिचरमुळे ग्रुप ॲडमिन वेळोवेळी मेसेज डिलीट करून स्टोरेज कार्यक्षमता सक्षम करू शकतात. 

NBT

WABetaInfo ने अँड्रॉइड आणि आयओएसमधील व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनवर हे नवीन फीचर स्पॉट केले आहे. WABetaInfo च्या मते, हे फीचर सुरू झाल्यावर, मेसेज डिलीट होण्यापूर्वी आता चॅटमध्ये संदेश किती काळ राहिल हे आता युजर्स ठरवू शकतात. सध्या हे फिचर केवळ व्हॉट्सअॅप ग्रुप चॅटसाठी आणले जात आहे. वैयक्तिक चॅटसाठी लवकरच हे फिचर आणले जाऊ शकते.

अधिक वाचा : सलमानचा फॅमिलीसोबत हटके बर्थडे (video)

IOS वर हे फिचर 2.20.10.23 या व्हर्जनवर आहे. त्याच वेळी Android साठी 2.19.275 व्हर्जनवर रोलआऊट झाले आहे. WABetaInfo ने नमूद केले की हे फिचर या क्षणी केवळ ग्रुप ॲडमिन्स याचा वापर करू शकतात. किती वेळात मेसेज डिलीट झाले पाहिजेत यासाठी वेळ निश्चित करू शकतात. संदेश हटविण्यासाठी एक तास, एक दिवस, आठवडा, एक महिना आणि वर्षाचा पर्याय उपलब्ध आहे. 

Back to top button