नोकरी करताय? मग, ‘या’ गोष्टींचे पथ्य पाळा | पुढारी

नोकरी करताय? मग, 'या' गोष्टींचे पथ्य पाळा

नोकरी करणाार्‍या स्त्रियांच्या आरोग्य व सौंदर्य यावर घाला घालणार्‍या मायग्रेन, कंबर, पाठदुखी, फ्रोझन शोल्डर यासारख्या अनेक विकारांची कारणे असतात आणि यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच खालील काही गोष्टींचे पथ्य पाळले, तर आरोग्य उत्तम राहू शकेल.

काम करताना आपण विविध ढबीत बसून बघावे व त्यानंतर ठरवावे की, नेमक्या कोणत्या पद्धतीने बसल्यावर आपला देह हा अवघडला जात नाही.

पाठीस पोक न काढणे, अंधारात काम न करणे.

खूप पुढे वाकून बसून काम न करणे, पायावर पाय टाकून न बसणे.

कॉम्प्युटरवर काम करताना अ‍ॅडजेस्टेबल खुर्चीचा वापर करावा.

आपण काम करताना ज्या खुर्चीवर बसतो, ती आपल्या कंबरेखालील भागास आधार देणारी हवी.

आपल्या कंबरेस आधार मिळत नसेल, तर कुशन ठेवून तो द्यावा.

जेवण गरम राहील, अशा टिफिनमध्ये न्यावे. यात हिरव्या भाज्या, दही, डाळ इत्यादींचा समावेश असावा.

सारखे सारखे चहा, कॉफीवर जोर देऊ नये.

काहीवेळा मोडावलेली कडधान्ये (उदा. मूग, मटकी, सोयाबीन्स) न्यावीत.

कॉम्प्युटरवर वा टाईपरायटरवर काम करणार्‍या स्त्रियांनी नेहमी लक्षात ठेवावे की, हातांना खूप ताण बसू देऊ नये. हात थोडे ढिले सोडून व हलक्या हातानेच टाईप करावे.

ऑफिसमधील खुर्चीवर जेव्हा बसाल तेव्हा आपली कंबर, गुडघे, पायांच्या पोटऱ्या यावर दाब पडेल, अशा प्रकारे बसणे टाळावे. हात व पायांची बोटे हालत राहतील असे काम करावे.

हेही वाचा : 

 

Back to top button