Beauty Products: कॉस्मेटिक्स फेकून देताय? हे जरूर वाचा! | पुढारी

Beauty Products: कॉस्मेटिक्स फेकून देताय? हे जरूर वाचा!

किर्ती कदम

सौंदर्यवर्धनासाठी आपण अनेक प्रसाधने वापरतो. ती अर्थातच महागही असतात. या सर्व उत्पादनांच्या वापराची काही मर्यादा असते. ती संपल्यावर टाकून देण्याआधी थोडा विचार केल्यास त्यातून काही नव्या गोष्टी (Beauty Products) बनवता येतात.

Beauty Products:

मस्कारा : डोळे आकर्षक दिसावेत म्हणून महागडा मस्कारा आणला जातो; पण काही काळाने तो वापरण्याची मुदत संपते. त्यामुळे डोळ्यासारख्या नाजूक भागावर त्याचा वापर करता येत नाही. अशावेळी मस्कार्‍याचा ब्रश शाम्पूूने स्वच्छ धुवून घ्यावा. भुवया व्यवस्थित विंचरण्यासाठी ब्रशचा वापर (Beauty Products) करावा.

स्कीन टोनर : त्वचा स्वच्छ करण्यासाठी टोनरचा वापर केला जातो. मुदतबाह्य झालेले टोेनर टाकून देण्यापेक्षा काच आणि आरसा स्वच्छ करण्यासाठी वापरता येते. यासाठी काचेवर टोनर स्प्रेने शिंपडावे. कापड किंवा वाईपच्या मदतीने काच स्वच्छ करावी.

संबंधित बातम्या

आयशॅडो : आयशॅडोची मुदत संपल्यास हे सर्व रंग नेलपॉलिशमध्ये मिसळावे आणि नखांना लावावे.

लिपस्टिक : लिपस्टिक मुदत संपल्यानंतर टाकून द्यावी लागते. अशावेळी उरलेली लिपस्टिक एका चमच्यात घेऊन ती मेणबत्तीच्या आचेवर गरम करावी. मग ही लिपस्टिक व्हॅसलीनमध्ये मिसळावी. आवडत्या रंगाचा लिपबाम तयार. गरम करून वितळल्यामुळे लिपस्टिकमधील जीवाणू नष्ट होतात.

हेही वाचा:

Back to top button