बाहेर जाण्यासाठी पटकन तयार व्हायचंय, फॉलो करा ‘या’ टिप्स | पुढारी

बाहेर जाण्यासाठी पटकन तयार व्हायचंय, फॉलो करा 'या' टिप्स

गृहिणी असाल तरी कुठे ना कुठे जायचे असते. महिला मंडळ, किटी पार्टी, मुलांच्या शाळेत, कॉलेजमध्ये, बचत गट, नातेवाईकांच्या समारंभाला हजेरी लावणे हे सर्व करावेच लागते. मग गृहिणी असो वा ऑफिस वुमन स्वत:ला नीटनेटके प्रेझेंट करणे, त्यासाठी वेळ देणे आवश्यक ठरते.

झटपट तयार होण्यासाठी अशा काही टिप्स आहेत की ज्यामुळे तुमच्या चेहर्‍यावर थकवा दिसणार नाही. तुम्ही अगदी दोन मिनिटांतच ताजेतवाने व्हाल.

तेलकट त्वचा असल्यास तुम्ही मेकअप नसेल केला तर दोन तीन वेळा आपला चेहरा पाण्याने धुवा. त्यामुळे चेहर्‍यावर प्रसन्नता कायम राहील. तेलकट असल्यास त्वचेला टिश्यू पेपरने पुसावे. त्यामुळे चेहर्‍यावर अतिरिक्त ऑईल जमणार नाही. रात्री बाहेर जायचे असेल तर फेसवॉशने चेहरा चांगल्या प्रकारे धुवा. मग शाईन फ्री फाऊंडेशनचा वापर करा. झोपण्याअगोदर एक्सफोलिएटिंग फेसवॉशने चेहरा धुऊन नाईट क्रीम लावावे.

संबंधित बातम्या

दिवसा तुम्ही पूर्ण चेहर्‍यावर मेकअप नाही केला तरी काही हरकत नाही, गालावर हलका मेकअप करुन चेहर्‍याचे सौंदर्य वाढवू शकता. ब्लशच्या हलक्या व सॉफ्ट शेड किंवा ब्रॉजिंग पावडरद्वारे चेहर्‍याला नॅचरल लुक देऊ शकता. रात्रीच्या वेळेस गालावर डार्कशेडचे ब्लश लावावे किंवा ब्रॉजिंग पावडर लावावी. पण हे योग्य प्रमाणात लावावे. अन्यथा चेहर्‍यावरची चमक निघून जाऊ शकते.

नुसताच चेहर्‍याला ग्लो असेल आणि हाताकडे तुमचे लक्ष नसेल तर बघणार्‍याला थोडेसे खटकते. त्यामुळे चेहर्‍याबरोबरच तुमचे हात, बाहूही उत्तम ठेवा. स्लीव्हलेस ड्रेस, ब्लाऊज घालायचा असेल तर हात, दंड सुडौल असायला हवेत, याची काळजी घ्या.

तुमच्या बॅगमध्ये कॉम्पॅक्ट पावडर किंवा पॅन केक ठेवा. इमर्जन्सी जर फंक्शनला जायचे झाल्यास क्लिंझिंग मिल्कने चेहरा स्वच्छ करुन थोडीशी पावडर लावल्यास ताजेतवाने दिसाल. चेहर्‍यावर ग्लो येईल.

दिसण्याबरोबर दाताचे सौंदर्यही टिकवायला हवेत. तुमचे दात चांगले असतील तर त्याचा प्रभाव तुमच्या चेहर्‍यावर लगेचच दिसून येतो. दातांची स्वच्छता योग्य प्रकारे करा. बाहेर जाण्याअगोदर माऊथ वॉश घ्यावे. तुमचे दात चमकत नसतील तर लिंबाच्या सालांनी हलक्या हाताने दातावर घासावे.

Back to top button