फॅशन : दुपट्टा वापरताय? | पुढारी

फॅशन : दुपट्टा वापरताय?

लेहंग्यावर दुपट्टा किंवा ओढणी घेतली की स्त्रीचे सौंदर्य त्या पेहरावात अधिकच खुलून दिसते. लेहंग्यावर विविध तर्‍हेने आपण दुपट्टा घेऊ शकतो. कशा प्रकारे ते पाहूया.

शॉल : लेहेंगा घातल्यानंतर दोन्ही खांद्यावरून पाठीच्या बाजूने सैल सोडून पुढे घ्या. फक्त पुढे दोन्ही टोके समान दिसतील याची खात्री करा. ज्या तरुणींचा शेलाटा आणि उंच बांधा असेल, ज्यांना आपले सपाट पोट दाखवायला आवडेल अशांसाठी ही स्टाईल एकदम भारी दिसेल.
स्कार्फ : आपण दुपट्टा स्कार्फ प्रमाणे गळ्याभोवतीही बांधू शकतो. गळ्याभोवती गुंडाळून एक टोक पुढे नि दुसरे मागे एकाच उंचीचे जाईल हे पहा.
पारंपरिक पद्धत : दुपट्ट्याच्या निर्‍या घाला. उजव्या खांद्यावरून पीन लावून पदरासारखे टोक पुढे लांब सोडा आणि दुसरे टोक पाठीमागून नेऊन कंबरेभोवती आणून त्याचे फक्त एक टोक डाव्या बाजूला खोचा किंवा पीनने लावा.
पौराणिक पद्धत ः आपण गुजराती किंवा मराठी पद्धतीची साडी नेसतो त्यासारखाही दुपट्टा आपण घेऊ शकतो. उजव्या खांद्यावरुन पदरासार? मागे सोडा आणि पुढचे टोक नेऊन मागे अडकवा. किंवा डाव्या खांद्यावरून पुढे छोटा पदर लावा आणि दुसरे टोक मागे उजव्या बाजूच्या कमरेला लावा. त्यामुळे ही लेहेंगा साडी दिसू शकते.

पुढे लावा : जशी आपण ओढणी दोन्ही खांद्यावरून मागे टाकतो तशा पद्धतीने ओढणी गळ्याभोवती गुंडाळून मागून पुढे आणायची पुढची दोन्ही टोकेसारखीआली पाहिजेत.

संबंधित बातम्या
Back to top button