फॅशन-पॅशन : क्लचची निवड करताना… | पुढारी

फॅशन-पॅशन : क्लचची निवड करताना...

एखाद्या पार्टीमध्ये सुंदर आणि भरजरी साडी घातली असेल आणि हातामध्ये अगदी सर्वसामान्य पर्स असेल, तर सगळे व्यक्‍तिमत्त्वच प्रभावहीन दिसू लागते. हल्ली साडी, ड्रेस, ज्वेलरी याबरोबर तुमची पर्स किंवा क्लचकडेही लक्ष द्यावे लागते. म्हणजे पार्टीवेअर क्लच असायलाच हवे! क्लच खरेदी करताना काही गोष्टी ध्यानात ठेवायला हव्यात.

• ब्लॅक आणि न्यूट्रल कलर्स कोणत्याही समारंभातील रंगाच्या पेहरावावर उठून दिसतात. तुम्हाला रंगीत क्लच घ्यायचे असेल तर बेज, बॉटल ग्रीन किंवा केनरी येलो यासारखे रंग निवडा.

 लग्न समारंभ, रिसेप्शन, ऑफिशियल फंक्शन असेल तर थोडं फार नक्षीकाम केलेलं आणि खड्यांनी सजवलेले क्लच निवडा.

संबंधित बातम्या

• स्वस्त असलेले क्लच आणि त्याचा दर्जा पाहता उत्तम दर्जाचे लेदर क्लच खरेदी करा. लेदरमध्ये ब्राऊन कलरचा क्लच घ्या. जर लेदरमध्ये नको असेल तर कॉर्क क्लचही निवडू शकता.

• क्लच निवडताना चेन किंवा त्याची बटणे नीट आहेत का ते तपासून घ्या. 

• क्लच म्हणजे फक्‍त हातात ठेवायची पर्स असा अर्थ न घेता, थोड्या कमी उंचीचा बेल्ट असलेली किंवा सोनेरी, चंदेरी चेन असलेला क्लच निवडा. हातात घेऊन वावरणेही सोपे जाईल.

• वर्किंग वूमनसाठी क्लच हा उत्तम पर्याय आहे. क्लच मोठ्या आकाराचा न घेता कमी कप्पे असलेला घ्या. म्हणजे सामान जास्त कोंबलं जाणार नाही.

• जाड व्यक्‍तींना चौकोनी, त्रिकोणी आकाराचा क्लच शोभून दिसतो.

• बारीक अंगकाठी असलेल्या महिलांना गोल क्लच चांगला वाटतो. 

• क्लचमध्ये मोबाईल, लिपस्टीक, काँपॅक्ट पावडर, गाडीची चावी आणि एटीएम आणि क्रेडिट कार्ड, काही पैसे इतकंच सामान असावं.

Back to top button