‘कस्तुरी क्‍लब’तर्फे आज मकर संक्रमण सोहळा | पुढारी

‘कस्तुरी क्‍लब’तर्फे आज मकर संक्रमण सोहळा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबतर्फे मकर संक्रमण सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हळदी-कुंकू, आकर्षक वाणासोबत  कलाकारांच्या भेटीगाठीत सोहळा रंगणार आहे. आज, दि. 29 जानेवारी रोजी दु. 3.30 वाजता राजारामपुरीतील व्ही. टी. पाटील भवन, कमला कॉलेज येथे कार्यक्रम होणार आहे.

महिलांसाठी प्रल्हाद पाटील यांच्यातर्फे  विविध मनोरंजनात्मक धमाल गेम्स, सोबत भरपूर बक्षिसांची लयलूट आणि पैठणी जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. कार्यक्रमादरम्यान कलर्स मराठीवरील ‘राजा राणीची ग जोडी’ या मालिकेतील वहिनी म्हणजेच श्रुती अत्रे आणि ‘सूर नवा, ध्यास नवा’ यातील गायक राजू नदाफ यांना प्रत्यक्ष भेटण्याची आणि राजू नदाफ याचे गाणे प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे.

प्रत्येकीला तिळगूळ, हळदी-कुंकू आणि आज कार्यक्रमाला उपस्थित असणार्‍या कस्तुरी सभासदांना  संक्रांत वाण दिले जाणार आहे. कार्यक्रम फक्‍त कस्तुरी सभासदांसाठी असून, ओळखपत्र आवश्यक आहे. कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक आर. सी. बाफना ज्वेलर्स व सहप्रायोजक सार्थ आयुर्वेद आहेत. 

अधिक माहितीसाठी संपर्क : टोमॅटो एफ.एम., वसंत प्लाझा, राजाराम रोड, बागल चौक. 8805007724, 8805024242, 9404684114.

संबंधित बातम्या

Back to top button