दिसू सुंदर : ट्रेंड रेडिमेड ब्लाऊजचा | पुढारी

दिसू सुंदर : ट्रेंड रेडिमेड ब्लाऊजचा

पूर्वीच्या काळी कुठल्याही साडीवर काळे, पांढरे, तांबडे अशा ठरावीक रंगाचेच ब्लाऊज घातले जायचे किंवा फार तर खणाचे ब्लाऊज वापरले जायचे. पण आता काळ बदलला आहे. फॅशनच्या जगतात विविध प्रकारे सजवलेल्या ब्लाऊजची फॅशन चांगलीच रूळली आहे. बाजारात सध्या रेडिमेड ब्लाऊजला भरपूर मागणी असल्याचे दिसून येते. होजिअरी, लिअग्रा यांसारख्या फॅब्रिकमध्ये उत्तम फिटिंगचे ब्लाऊज सामान्य किमतीत मिळते. यामध्ये कॉन्ट्रास्ट किंवा मिक्स अ‍ॅण्ड मॅचचा चांगला पर्यायदेखील उपलब्ध असल्याने असे ब्लाऊज महिला मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.

ब्लाऊज खरेदी करताना त्याची रंगसंगती ही विरुद्ध असावी. मिक्स अ‍ॅण्ड मॅचचा आणखी एक फायदा म्हणजे एकच ब्लाऊज दोन-तीन साड्यांवर घालता येतो. एका साडीवर मॅचिंग असणारे ब्लाऊज दुसरीवर क्लोज कॉन्ट्रास्ट आणि तिसरीवर आऊटराईट कॉन्ट्रास्ट ठरते. ब्लाऊज विकत घेताना काही आधुनिक प्रकारदेखील विकत घ्यावे. अलीकडे ब्लाऊजच्या नेकलाईनमध्ये हायनेकपासून डिप लो कटस्पर्यंत अनेक प्रकार बघायला मिळतात. हे सर्व प्रकार एकदा बघून मग ब्लाऊजची निवड करावी. बाह्यांमध्येदेखील स्लीवलेस, मेगास्लीव्ज रेग्युलर स्लीव्ज, थ्री फोर्थ, फुली स्लीव्ज, स्पॅगेटी टाईप, हॉल्टरनेट असे कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी आपल्याला शोभतील आणि वेळप्रसंगाचे भान राखून ब्लाऊजची निवड करावी..

फिटिंगच्या पॅटर्नमध्येही बरेच पर्याय दिसतात. कटोरी किंवा साधे ब्लाऊज हे तर पारंपरिक पर्याय आहेतच; पण त्याचबरोबर प्रिंसेस कट, चोलीसारख्या स्टाईलदेखील चांगल्या चलतीत आहेत. अर्थात हे प्रकार लग्नसमारंभ, पार्टी यासाठीच चांगले दिसतात. दैनंदिन वापरासाठी मात्र सौम्य डिझाईनचे ब्लाऊजच चांगले दिसतात. ऑफिसमध्ये जाताना तर ब्लाऊज थोेडे रुंद आणि साधेच योग्य ठरते. विरुद्ध रंगाची संगती चालू शकते, पण त्यावर फार वर्क नसावे. अशा प्रकारे तयार ब्लाऊजचा पर्यायदेखील थोड्या विचारपूर्वक पद्धतीनेच निवडणे योग्य ठरते. 

संबंधित बातम्या

Back to top button