मल्टिमीडिया डिझायनर बनायचंय? | पुढारी | पुढारी

मल्टिमीडिया डिझायनर बनायचंय? | पुढारी

मल्टिमीडिया हा शब्दही आता परवलीचा झाला आहे. माध्यमांची एकाहून अधिक रुपे सर्जनशील संवादासाठी वापरणे ही पायाभूत संकल्पना. या सर्जनशीलतेमध्ये विविध संवाद माध्यमांची मदत घेतली जाते जसे संदेश, ग्राफिक्स, चित्रे, हालती डुलती चित्रे, आवाज किंवा ऑडिओ, चलचित्र किंवा व्हिडिओ या पैकी काहीही आणि कितीही माध्यमे एकावेळी वापरली जातात. आपला संदेश परिणामकारकरीत्या पोहोचवण्यासाठी विविध कलाप्रकार किंवा कल्पनांचा वापर करायचा असे या कामाचे स्वरूप असते. 

मल्टिमीडिया डिझायनरचे काम : मल्टिमीडिया डिझायनर मीडिया फाईल्सचे वेगवेगळे आकर्षक प्रती करतो किंवा फाईल्स तयार करतो ज्या संकेतस्थळे, मोबाईल अ‍ॅप्लिकेशन, टीव्ही, सिनेमा आणि व्हिडिओ गेम्ससाठी वापरले जाते. स्पेशल इफेक्टचा वापर करून चित्ताकर्षक जाहिराती निर्माण करण्यात डिझायनर खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो. 

 पात्रता : मल्टिमीडिया डिझायनर होण्यासाठी खालीलपैकी कोणतीही पात्रता असणे उपयुक्‍त ठरते.  मल्टिमीडिया डिझायनिंगमधील पदवीफ्लॅश, फोटोशॉप किंवा ड्रिमव्हिवर सारख्या सॉफ्टवेअरमध्ये डिझायनिंग सर्टिफिकेट. 

 
आवश्यक कौशल्ये- 

संबंधित बातम्या

मल्टिमीडिया डिझायनर्ससाठी काही कौशल्ये अंगी बाणवणे गरजेचे असते. • सर्वात पहिले कौशल्य म्हणजे आयटीची कौशल्ये. माहिती तंत्रज्ञानाची इत्यंभूत माहिती असल्यास मल्टिमीडिया डिझायनर म्हणून खूप दीर्घकाळ प्रगती करू शकता. • सर्जनशीलता हा तर यातील कळीचा मुद्दा आहे. उत्प्रेरकासारखे काम करतो तो. त्यामुळे दर्जा, गुणवत्ता येते त्यामुळे डिझायनरसाठी सर्जनशीलता महत्त्वाचीच. • नव्या तांत्रिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नव्या नव्या सॉफ्टवेअर्सचे ज्ञान मिळवल्यास ते फायदेशीर ठरते. 

नोकरी मिळण्यासाठी- 

स्वतःची माहिती किंवा पोर्टफोलियो तयार करावा. आपल्या कामातून कौशल्य दिसणे अधिक चांगले. त्यामुळे कौशल्य पणाला लावून उत्तम कामाची निर्मिती करा जेणेकरून ते कामच आपल्या कौशल्याविषयी बोलेल.  इंटर्नशिप म्हणजे काम शिकण्याचा अनुभव घ्या. बहुतेकदा मल्टिमीडिया इंटर्नशिप या विद्यावेतनासह असतात. ज्या क्षेत्रात शिरकाव करायचा तिथे अनुभव मिळणे हा नक्‍कीच उत्तम फायदा आहे. इंटर्नशिपमुळे त्या क्षेत्राचा विस्तार कळतोच पण आपल्या रिझ्युमेमध्ये कौशल्य वर्धन करणारा एक मुद्दा येतो. 

जबाबदार्‍या- 

ग्राहकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या नेमक्या गरजा समजून घेणे.  सर्जनशील काम करताना प्रकाश आणि पोत आणि आकारमान यांचा योग्य वापर करून वास्तववादी चित्र निर्माण करणे

संघसमूहाशी योग्य समन्वय साधणे • डेडलाईन किंवा वेळेची मर्यादा पाळणे किंवा वेळेच्या मर्यादेत काम करणे.  आपल्या डिझाईनचे त्यातील शब्दांचे पुनर्वाचन किंवा मुद्रीत शोधन करणे. 

वेतन- 

भारतात मल्टिमीडिया डिझायनरला मिळणार्‍या वेतनाची श्रेणी चांगली आहे. भारतात वर्षाला तीन लाख साठ हजार वेतन मिळते. परदेशातही मल्टिमीडिया डिझायनर्सना उत्तम संधी आणि वेतन लाभू शकते. ते अर्थात सर्व कौशल्यावर अवलंबून असते. 

 
आर्थिक भत्ते- 

सर्वसाधारणपणे मल्टिडिझायनर्स 9 ते 5 या वेळेत काम करतात. त्यामुळे त्यांची नोकरी ही 8 तासांची असते.  अधिक पैसे कमावण्यासाठी अनेक मुक्तपणे काम करण्याच्या संधी मिळतात. त्यामुळे जास्तीचे पैसे मिळू शकतात.  ही नोकरी फिरतीची नसते. त्यामुळे फार दमणूक होत नाही. प्रत्येक माध्यमाची उत्तम डिझाईन ही गरज असते. त्यामुळे या प्रगत होत जाणार्‍या क्षेत्रात सतत काम मिळत राहते. • बहुतेक सर्व कंपन्या घरून काम करण्याची संधीही देतात. त्यामुळे गरजेनुसार आपल्या सोयीने घरातूनही काम करता येते. 

लोकप्रिय मल्टिमीडिया सॉफ्टवेअर्स-

डिझायनिंगच्या क्षेत्रात काही प्रसिद्ध लोकप्रिय सॉफ्टवेअर्स खूप महत्त्वाचे योगदान दिले आहे. या सॉफ्टवेअरचे ज्ञान असल्यास इतरही सॉफ्टवेअर्स सहजपणे शिकता येतात. 

ऑडियो व्हिडिओसाठी व्हीएलसी प्लेअर ऑडियो व्हिडिओसाठी विंडोज मीडिया प्लेअर फिल्म बनवण्यासाठी मुव्ही मेकर

फोटो एडिटिंगसाठी अडोब फोटोशॉप अ‍ॅनिमेशनसाठी फ्लॅश प्लेअर

मल्टिमीडिया डिझायनर लागणारे उद्योग-

जाहिरात क्षेत्रात जाहिरातीसाठी डिझायनर 

वर्तमानपत्राच्या लेआऊट, मासिके आणि संकेतस्थळावरील पेजेच्या डिझायनिंगसाठी

विक्रीविपणनासाठी सर्जनशील कंटेंटसाठी 

मनोरंजन उद्योगात व्हिडिओ आणि ऑडिओ तयार करण्यासाठी डिझायनर्स  शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना योग्य ती कौशल्ये शिकवण्यासाठी अनुभवी आणि ज्ञानी शिकवू शकणारे डिझायनर. 

 कशी शोधाल नोकरी?

करिअर संधींसाठी विविध कंपन्यांच्या संकेतस्थळाला भेट द्या. त्यांच्या संकेतस्थळावर असा काही पर्याय नसेल तर कंपनीच्या ईमेल शोधून त्यावर रिझ्युमे पाठवावा. मुक्‍तपणे काम करायचे असेल तर कंपनीच्या मानवसंसाधन अधिकारी किंवा त्याही पेक्षा वरच्या पदाच्या अधिकार्‍याशी संबंध प्रस्थापित करा. त्यामुळे एकदा कामामुळे त्यांच्यावर छाप पडली की घरी देखील पूर्णवेळ काम करता येईल.बिझिनेस कार्डचा वापर करा. लहान असले तरीही त्यातून आपली कौशल्ये समोरच्या व्यक्‍तीपर्यंत सहज पोहोचवू शकता. हा पर्याय काम मिळवण्यासाठी उत्तम ठरतो. 

नोकरी देताना कंपनीची उमेदवारांकडून अपेक्षा-

अगदी नव्या प्रगत तंत्रज्ञानाचे ज्ञान 

गरजेप्रमाणे सर्जनशील उकल किंवा उपाय सुचविण्याची क्षमता

कल्पना सुचवताना विचारांची स्पष्टता

आकर्षक शैक्षणिक पात्रता

डिझायनिंगमधील अनुभव. 

विजयालक्ष्मी साने

Back to top button