प्रत्यक्ष आणि ऑनलाईन शिक्षणात गुणवत्तेची तफावत? | पुढारी

प्रत्यक्ष आणि ऑनलाईन शिक्षणात गुणवत्तेची तफावत?

सध्या कोविड -19च्या प्रादुर्भावाने शाळा बंद पण शिक्षण सुरु अशी बातमी रोजच कानावर पडते. म्हणजे नेमक काय तर प्रत्यक्ष शिक्षण न देता ते ऑनलाईनच्या माध्यमातून ते देण्यात येत आहे. पण वास्तविकता पाहता ऑनलाईन शिक्षण हे सर्वापर्यंत पोहचले नाही. कारण सर्वच पालकांकडे स्मार्ट फोन नाहीत तसेच सर्वच भागात इंटरनेट सुविधा नाही. अशा परिस्थितीत सर्वांपर्यंत पोहोचणे अवघड आहे. पण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने विध्यार्थ्यांपर्यंत शिक्षक पोहोचलेला आहे.

सध्यपरिस्थिती पाहत असताना नवीन शैक्षणिक वर्षातील सरकारची पाठ्यपुस्तके मुलांपर्यंत पोहोचविली आहेत. नवीन पुस्तकांमध्ये क्यूआर कोड असल्याने दिक्षा ॲपच्या सहाय्याने विद्यार्थी स्व-अध्ययन करू शकतो. पण यालादेखील स्मार्ट फोन, नेटवर्क यांच्या मर्यादा येतात. याठिकाणी 100%ऑनलाईन शिक्षणाची यशस्वीता ग्राह्य धरता येत नाही. पण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारने उत्तम मार्ग शोधला तो म्हणजे दूरदर्शनवरील सह्याद्री चॅनेलवरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचता येईल म्हणून टिलिमिली ही शैक्षणिक मालिका सुरु केली. या माध्यमातून थोडी अभ्यासाची गोडी मुलांना लागली आणि मुले आवडीने शैक्षणिक कार्यक्रम पाहू लागली. शिक्षक आपल्या वर्गाचे Whatsapp ग्रुप बनवून रोजच pdf फाईल पाठवत आहेत. 

थोडक्यात स्मार्ट फोन असणारे आणि टीव्हीची सुविधा असणारी मुले शिक्षण प्रवाहात आली म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. पण या दोन्हीही सुविधा नसणाऱ्या मुलाचं काय? त्यांच्यासाठी कोणती सुविधा? अशा अनेक प्रश्न आहेत. प्रत्यक्ष शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण यांच्यामध्ये गुणवत्तेची तफावत रहाणार आहेच. शिवाय ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण सर्वांना मिळणार नाही. शिवाय ऑनलाईन शिक्षण कितपत यशस्वी झाले हे आताच सांगता येणार नाही. पण गोंधळलेली मुलं आणि पालक व मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपडणारे शिक्षक हे सर्व पहात असताना सध्यपरिस्थितीत ऑनलाईन शिवाय पर्याय नाही. सध्या शाळा बंद असल्या तरी मुलांपर्यंत शिक्षण पोहोचत आहे. ऑनलाईन शिक्षण कितपत यशस्वी झाले हे शाळा सुरु झाल्याशिवाय समजणार नाही. 

 

Back to top button