सुपरकार McLarenचे शोरूम लवकरच मुंबईत | पुढारी

सुपरकार McLarenचे शोरूम लवकरच मुंबईत

सुपरकार McLarenची शोरूम लवकरच मुंबईत

मुंबई : पुढारी ऑनलाईन – लक्झरी आणि सुपरकार प्रकारातील कार निर्मितीतील जगप्रसिद्ध मॅकलरेन ही कंपनी भारतात कार लाँच करत आहे. मॅकलरेनची भारतातील पहिली शोरूम मुंबईत सुरू होणार आहे. Everyday McLaren GT आणि Artura अशा काही कार भारतात उपलब्ध होणार आहेत. मॅकलरेन ऑटोमोटिव्हने आज ही घोषणा केली. मुंबईच्या शोरूममध्ये सेल्स, विक्रीपश्चात सेवा अशा सेवा मिळणार आहेत.

मॅकलरेन कंपनीच्या कार ब्रिटनमध्ये बनतात. या कार Hand Built प्रकारच्या असतात. सध्या ४० देशांत या कंपनीच्या कार उपलब्ध आहेत. “भारत आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम कार घेता येतील. Artura ही नवीन हायब्रीड सुपरकार असून ती भारतात लवकरच उपलब्ध होईल,” अशी माहिती कंपनीने दिलेली आहे. Everyday McLaren GT ची किंमत ३ कोटी ७२ लाखांच्या पुढे आहे.

हेही वाचा

Back to top button