Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार, २६ मार्च २०२४ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार, २६ मार्च २०२४

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : आज ग्रहमान अनुकूल राहील.विविध कामांमध्ये व्यस्त राहाल. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास यश मिळेल. विद्यार्थ्यांना करिअरशी निगडीत समस्येवर उपाय सापडले, असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक कार्यात सहभागी व्‍हाल. मनाप्रमाणे कोणतेही इच्छित कार्य करण्यात यश न मिळाल्याने मन निराश राहील;पण धीर सोडू नका. प्रयत्न करत राहा.अनोळखी लोकांवर सहज विश्वास ठेवू नका.

वृषभ : आज काही खास लोकांशी भेट होईल. संवादाच्या माध्यमातून काम पूर्णत्‍वास जाईल. आपल्या कामाकडे दुर्लक्ष देवू नका. थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करू शकतो. अनावश्यक खर्चामुळे गुंतागुंत होऊ शकते. सध्या तुमचे बजेट सांभाळा. तुम्ही कायदेशीर वादातही अडकू शकता. वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. व्यवसायाशी संबंधित कामांसाठी अनुकूल दिवस.

मिथुन : संपर्काची वाढणारी सीमा ही भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक कामात यश मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात थोडा वेळ घालवा. यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. मालमत्ता किंवा वाहनाची समस्या जाणवू शकते, असे श्रीगणेश सांगतात. फोनवर किंवा मित्रांसोबत निष्‍कारण फिरण्‍यात वेळ वाया घालवू नका. आज व्यवसाय प्रक्रियेत काही बदल करण्याचा प्रयत्न करा.

कर्क : श्रीगणेश म्‍हणतात की, आज जीवनशैलीत काही सकारात्मक बदल अनुभवाल. जोखीम घेण्याची मनस्‍थिती असेल. एखाद्या विशिष्ट कार्यासाठी प्रयत्नशील राहा. तुम्हाला योग्य यश मिळू शकते; पण घाई टाळा. अनुभवी व्यक्तीशी चर्चा करत राहा. तुमच्या योजनेनुसार कामे न केल्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. खर्च वाढला तरी उत्पन्नाच्‍या साधनातही वाढ होईल. मार्केटिंग संबंधित कामांचा विस्तार करण्यावर भर द्या. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ नाही. वैवाहिक जीवन आनंदी होऊ शकते. गुडघे आणि सांधे दुखीचा त्रास जाणू शकतो.

सिंह : कौटुंबिक सुखसोयींशी संबंधित वस्तूंची खरेदी कराल. विद्यार्थ्यांच्या अभ्यास आणि करिअरशी संबंधित कोणत्याही समस्येवर उपाय मिळाल्याने तुम्हाला तणावमुक्त वाटेल. एखाद्या विश्वासू व्यक्तीला तुमची योजना सांगितल्यास योग्य सल्ला मिळेल. आवश्यक खर्चात कपात करावी लागू शकते, असे श्रीगणेश सांगतात. छोट्या-छोट्या गोष्टींवर नाराज होणे तुमच्या स्वभावात असेल. महिन्याच्या सुरुवातीला काही आव्हान असेल.

कन्या : शिक्षणाशी संबंधित अडथळा दूर झाल्यामुळे विद्यार्थी पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. मालमत्तेसंबंधी कोणताही वाद शांततेने सोडवाल. पॉलिसी किंवा प्रॉपर्टी इत्यादीमध्ये गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. कोणाबद्दलही घाईघाईने निर्णय घेऊ नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. चुकीच्या कामात वेळ वाया गेल्याने मन निराश होईल. व्यवसायात काही लाभदायक पदे मिळतील.

तूळ: लोकप्रियतेबरोबरच जनसंपर्काची व्याप्तीही वाढणार असल्याचे श्रीगणेश सांगतात. रखडलेली कामे पूर्ण होतील. फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. एखाद्या संस्थेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. कोणतीही योजना करण्यापूर्वी, त्यांचा गांभीर्याने विचार करा. अन्यथा काही चुका होऊ शकतात. आर्थिक व्यवहारात कोणावरही विश्वास ठेवण्याआधी योग्य ती मेहनत करा.

वृश्चिक: श्रीगणेश सांगतात की, तुम्ही कामांमध्ये व्यस्त राहाल आणि सामाजिक सीमाही वाढतील. प्रतिष्ठित लोकांच्या भेटीमुळे फायदा होईल. मौल्यवान वस्तूंची खरेदी देखील शक्य आहे. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी असू शकते. महिन्याच्या सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात. नकारात्मक कृती करणाऱ्या लोकांपासून दूर राहा, चुकीचा सल्ला तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करू शकतो. घरातील मोठ्यांच्या सल्ल्याकडे आणि मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करू नका.

धनु: ग्रहस्थिती अनुकूल आहे. तुमच्या दृढनिश्चयाने सर्वात कठीण कामे पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात असेल. भांडवली गुंतवणूक करण्यासाठी वेळ योग्‍य आहे. मात्र इतरांच्या सल्‍ल्‍याने तुम्ही स्वतःचे नुकसान करू शकता. आळस टाळा.
मकर : तुमचे कामे व्‍यवस्‍थित पार पडतील. काही काळ तुमच्या विरोधात असलेले लोक आता तुमच्या बाजूने येतील. कर्ज घेणे टाळा. तुम्ही कोणाला वचन दिले असेल तर ते पूर्ण करण्याची जबाबदारीही तुमची आहे.

कुंभ: सकारात्मक आणि संतुलित विचारातून तुमचा मार्ग शोधू शकाल, असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबात काही काळापासून सुरू असलेले गैरसमज तुमच्या मध्यस्थीने दूर होतील. यावेळी वारसाहक्काशी संबंधित कोणत्याही विषयावर भावांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. कोणतीही नवीन गुंतवणूक टाळा. वैयक्तिक समस्या आणि अस्वस्थतेमुळे तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी जास्त वेळ घालवू शकणार नाही.

मीन: श्रीगणेश म्हणतात की, धार्मिक स्थळी गेल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल. सामाजिक किंवा समाजाशी संबंधित कामांमध्ये तुमचे विशेष योगदान असेल. तुम्ही अनेक कामांमध्ये व्यस्त असाल. अनावश्यक वाढलेले खर्च तुम्हाला त्रास देतील. घाई आणि अतिउत्साहामुळे केलेल्या गोष्टी बिघडू शकतात.

Back to top button