Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरुवार, २१ मार्च २०२४ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरुवार, २१ मार्च २०२४

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्तम वेळ असल्याचे श्रीगणेश सांगतात. जवळच्या नातेवाईकाचे सहकार्यही मिळेल. परिस्थिती अनुकूल राहील. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होईल. सामाजिक कार्यातही तुमची महत्त्वाची भूमिका असेल. भडक प्रतिक्रियापासून लांब राहा. घरातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याच्‍या समस्येमुळे महत्त्वाचे काम थांबू शकते.

वृषभ: श्रीगणेश म्हणतात की, आज कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. तुम्हाला नक्कीच चांगले यश मिळेल. तरुणांना करिअरशी संबंधित स्पर्धेत यश मिळेल. आर्थिक व्‍यवहारांसाठी वेळ अनुकूल नाही. कोणाशीही संबंध बिघडणार नाहीत, याची काळजी घ्‍या. जबाबदाऱ्यांच्‍या दबावामुळे वैयक्तिक कामांवर लक्ष केंद्रित करता येणार नाही. कामाच्या ठिकाणी मशिन, कर्मचारी इत्यादींबाबत समस्या उद्भवू शकतात.

मिथुन: दिनचर्या व्यवस्थित ठेवण्यासाठी संकल्प केल्‍यास यशस्वी व्हाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमच्या स्वभावात लवचिकता असणे महत्त्वाचे आहे. राग आणि हट्टीपणा यांसारख्या नकारात्मक सवयींवर मात करा; एकमेकांशी समन्वय साधून कोणतीही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कोणत्याही परिस्थितीत कुटुंबीयांचे पूर्ण सहकार्य असेल.

कर्क : आज तुमच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष द्या, असे श्रीगणेश सांगतात. दैनंदिन ताणतणावापासून मुक्त होणे देखील मानसिक शांती राखण्यास मदत करेल. कलात्मक क्षेत्रात रुची वाढेल. कुटुंबाच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय टाळा. आज व्यवसायाच्या ठिकाणी आपली उपस्थिती आवश्यक आहे.

सिंह: आज सकारात्मक लोकांसोबत थोडा वेळ व्‍यतित केल्‍यास तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत वाटेल. तरुण आपले ध्येय साध्य करण्यात यशस्वी होतील. घाईत घेतलेले निर्णय बदलावे लागू शकतात. तुमच्या वैयक्तिक कामांसाठी योग्य वेळ न मिळाल्याने तुमची निराशा होईल. व्यवसायात अपेक्षित परिणाम प्राप्त होतील. पती-पत्नीचे नाते मधुर राहील, असे श्रीगणेश सांगतात.

कन्या : आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस उत्तम असल्याचे श्रीगणेश म्‍हणतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. सामाजिक कार्यात वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. कोणाशीही वाद घालू नका. आपल्या स्वतःच्या कृतींवर लक्ष केंद्रित करणे चांगले. मुलांना जास्त मोकळीक दिल्याने त्यांचे अभ्यासातून लक्ष विचलित होऊ शकते. घरातील कोणाच्याही आरोग्याची चिंता असेल. व्यवसायातील सर्व कामे व्यवस्थित सुरु राहतील.

तूळ : आज कौटुंबिक जबाबदाऱ्या कुटुंबातील सदस्यांसोबत वाटून घ्या. त्‍यामुळे तुम्हाला आराम करण्यासाठी थोडा वेळ मिळेल. मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी योग्य वेळ आहे. संयमाने आणि विवेकाने काम करा, परिस्थिती लवकरच सुधारेल. तुम्हाला अपेक्षित यश मिळवण्‍यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल.

वृश्चिक: आज ग्रहस्थिती अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात. दिनचर्या शिस्तबद्ध ठेवल्‍यास रखडलेली कामे मार्गी लागतील. सकारात्मक दृष्टिकोन तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी करेल. तरुण त्यांच्या यशाने असमाधानी असतील. त्‍यांना अधिक मेहनतीची गरज आहे. कार्यक्षेत्रातील सहकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या.

धनु : प्रलंबित आर्थिक व्‍यवहार व घर बदलाचा विचार करत असाल तर आजचा चांगला दिवस आहे. जमीन किंवा वाहनासाठी कर्ज घेताना विचारपूर्वक निर्णय घ्‍या. महिलांनी त्यांच्या प्रतिष्ठेबद्दल अधिक जागरूक राहावे. रागावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.

मकर : आज जवळचे नातेवाईकांशी भेट होईल. चर्चा करून समस्या सोडवाल. सामाजिक उपक्रमांमध्ये तुमचा सहभाग लक्षणीय असेल. किरकोळ गैरसमजांमुळे मित्र किंवा भावंडांशी संबंध खराब होऊ शकतात. इतरांच्या सल्ल्याकडे लक्ष देणे देखील महत्त्वाचे आहे. जुन्या नकारात्मक गोष्टी त्रासदायक ठरणार नाही हे पाहा. आज व्यवसायात अत्यंत साधेपणाने आणि गांभीर्याने काम करण्याची गरजेचे आहे, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

कुंभ: आज ग्रहमान अनुकूल आहे. वेळेचा पुरेपूर फायदा घ्या. महिलांसाठी वेळ अनुकूल आहे.वैयक्तिक आणि व्यावसायिक कामे पूर्ण होतील. शेजाऱ्यांशी संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्‍या. कोणत्याही चुकीच्या कामांकडे लक्ष देऊ नका. सामाजिक आणि राजकीय कार्यात आपली प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. घरातील वातावरण प्रसन्न राहील.

मीन: श्रीगणेश म्हणतात की, आजचा दिवस एक सुखद अनुभव असेल. तुम्हाला तणावमुक्त वाटेल. कोणत्याही मुलाखतीत यश मिळाल्याने तरुणांचा आत्मविश्वास वाढण्‍यास मदत होईल. . आज प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. कल्पनांच्या दुनियेतून बाहेर पडण्यासाठी वेळ काढा. काही आवश्यक खर्च देखील येऊ शकतात. कामात अधिक एकाग्रता आणि गांभीर्य असण्याची गरज आहे. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे कठीण काळात पूर्ण सहकार्य मिळेल.

Back to top button