Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | सोमवार, १८ मार्च २०२४ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | सोमवार, १८ मार्च २०२४

चिराग दारूवाला :


चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष :
श्रीगणेश म्हणतात की, आर्थिक कामांमध्‍ये सकारात्‍मक प्रतिसाद मिळाल्‍याने आज तुम्‍हाला समाधान लाभेल. मात्र इतरांबद्दल संशयास्पद असण्याने नातेसंबंध खराब होण्‍याची शक्‍यता. विचारात लवचिकता ठेवा. भावनेच्‍या आहारी जावू नका. मुलांना त्‍यांच्‍या अडचणीत मदत करा. व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. अडचणीत जोडीदाराचे तुम्‍हाला योग्य मार्गदर्शन मिळेल.

वृषभ : आज दुपारनंतरची परिस्थिती अनुकूल राहील. त्यामुळे दिवसाच्या सुरुवातीलाच दिवसभरातील कामाचे नियोजन करा. कौटुंबिक आणि सामाजिक कार्यात तुमचा वेळ चांगला जाईल. नातेवाईकांशी मतभेद टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. अडचणीच्या वेळी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यवसायासंबंधी काही अडचणी आल्यास ज्येष्ठांचा आणि अनुभवी लोकांचा सल्ला घेणे आवश्यक ठरेल, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

मिथुन : आज सामाजिक कार्यात तुमचे विशेष योगदान असेल. त्‍यामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा उंचावेल, असे श्रीगणेश
म्‍हणतात. कौटुंबिक वाद टाळा. अप्रिय बातम्या मिळणे निराशाजनक असू शकते. या काळात आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. कोणतीही नवीन योजना सुरू करू नका. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ अनुकूल नाही. कौटुंबिक बाबींमध्ये हस्तक्षेप केल्याने घरातील वातावरण तणावपूर्ण होईल.

कर्क : आज जुन्या मित्राच्या भेटीमुळे तुमचा उत्साह वाढेल. मनोरंजनात वेळ व्‍यतित कराल. मदतीसाठी इतरांवर विसंबून राहण्याऐवजी स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्‍वास ठेवा. घरातील ज्येष्ठांचा आदर राखा. विद्यार्थी आणि तरुणांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावे. पैसे उधार घेऊ नका. घरातील वातावरण शांत राहील, असे श्रीगणेश सांगतात.

सिंह : आजचा दिवस सामान्य असेल. मुलांच्‍या समस्यांवर तोडगा निघाल्‍याने दिलासा मिळेल. वडिलधाऱ्यांच्या मदतीने वादग्रस्त मालमत्तेचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा. नवीन जबाबदारी चिंता वाढविणारी ठरेल. गुंतवणूक करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्‍या. कोणाशीही वाद घालू नका. कोणतेही महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेणे अनुकूल नाही, असे श्रीगणेश सांगतात.

कन्या: श्रीगणेश म्हणतात की, आज बहुतेक कामे व्यवस्थित सुरू राहतल. कौटुंबिक सुख-सुविधांच्या खरेदीवर खर्च जास्त होईल. कुटुंबाच्या सुखात खर्च होणार नाही. पैशाचे व्यवहार किंवा कर्ज घेण्यापासून दूर राहा. संवाद साधताना योग्‍य शब्‍दांचा वापर करा. व्यवसायातील सध्याची कामे थोडी मंद असतील.

तूळ: श्रीगणेश सांगतात की, संयम आणि चिकाटी तुमची दिनचर्या व्यवस्थित करण्यात मदत करेल. मुलांच्या प्रवेशासंबंधी कोणतीही अडचण दूर होईल. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात थोडा वेळ घालवल्यास मनःशांती मिळेल. आळस टाळा. तुमची कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यवसायाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंबासोबतही थोडा वेळ घालवा. आरोग्य चांगले राहिल.

वृश्चिक: तुमची एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे, असे श्रीगणेश म्‍हणतात. रखडलेल्‍या सरकारी कामाकडे लक्ष द्या. भावनिक होऊन चुकीचा निर्णय घेण्‍यापेक्षा विचार व्यावहारिक ठेवा. मीडिया आणि मार्केटिंगशी संबंधित व्यवसायात योग्य यश मिळू शकते. मानसिकदृष्ट्या कमजोर वाटू शकते.

धनु : गणेश सांगतात की, आज कामाचा व्‍याप असेल; पण मनाप्रमाणे यशही मिळाल्‍याने उत्साह वाढेल. तणाव दूर केल्याने तुम्हाला योग्य आणि महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेता येतील. काही वेळा सध्याच्या वातावरणामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो. सकारात्मकता आणि तुम्‍हाला आवड असणार्‍या गोष्‍टींमध्‍ये थोडा वेळ व्‍यतित करा. आळस आणि निष्काळजीपणा टाळा. दुसऱ्या व्यक्तीला तुमच्या कामात ढवळाढवळ करू देऊ नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

मकर: श्रीगणेश म्हणतात की, आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबातील व्यक्तीचा किंवा जवळच्या व्यक्तीचा सल्ला घ्या. हा सल्ला तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन दिशा दाखवू शकतो. घराच्या देखभालीसाठी योग्य वेळ आहे. मात्र वाहन किंवा घराशी संबंधित कोणतीही वस्तू खरेदी करण्याचे नियोजन टाळा. अचानक मोठा खर्च होऊ शकतो. तुमच्या हट्टीपणामुळे तुमच्या नात्यात दुरावा वाढू शकतो हे लक्षात ठेवा.

कुंभ: आज आपल्याला काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. त्यांचा स्वीकार करा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, असे श्रीगणेश सांगतात. घरातील समस्या सोडवण्यासाठी योग्य वेळ. मत्सरी लोकांपासून सावध राहा. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. आर्थिक व्‍यवहार करताना काळजीपूर्वक निर्णय घ्‍या.

मीन: आज एखादी चांगली बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील, असे श्रीगणेश सांगतात. तरुणांनाही त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. चुकीच्या खर्चामुळे बजेट बिघडू शकते. भावंडांसोबतचे चांगले संबंध राखण्‍यासाठी प्रयत्‍नशील राहा. कुटुंबातील सदस्यांमध्ये योग्य समन्वय राहील.

Back to top button