रेपको होम्स | पुढारी | पुढारी

रेपको होम्स | पुढारी

यावेळचा  चकाकता हिरा म्हणून ‘रेपको होम्स’ ची निवड केली आहे. 2022 सालापर्यत भारतात सगळ्यांना एक लहानशी तरी निवासिका देण्याचे सध्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे घरासाठी कर्जे देणार्‍या गृहवित्त संस्थांची चलती होणार आहे. दिवाण हाऊसिंग फायनान्स, एल.आय.सी. हाऊसिंग फायनान्स व रेपको होम्स, फोर. आर. यू. एच. जी. आयसी, हाऊसिंग फायनान्स इंडिया, बुन्स हाऊसिंग फासनान्स व रेपको होम्स या कंपन्या या क्षेत्रात अग्रेसर आहेत. रेपको होम्स गेल्या शुक्रवारी 580 रुपयांवर बंद झाला. गेल्या बारा महिन्यांतील किमान 510 रुपयांपेक्षा तो थोडा वर आहे. पण या आठवड्यात तो 520 रुपयांपर्यंत उतरला तर जरूर घ्यावा. गेल्या बारा महिन्यांतील कमाल भाव 924 रुपये आहे व येत्या बारा महिन्यांत तो निदान 750 रुपयांपर्यंत चढला तरी सध्याच्या खरेदीवर 40 टक्के नफा मिळेल.  सध्याच्या भावाला किं/यु गुणोत्तर 16.03 पट आहे. दोन महिन्यांपूर्वी हा भाव 725 रुपयांपर्यंत चढला होता. रेपको होम फायनान्सचे 2016 व 2017 मार्च वर्षाचे प्रत्यक्ष आकडे व 2016 ते 2020 मार्च या तीन पुढच्या वर्षाचे संभाव्य आकडे पुढे दिले आहेत.

रेपको होम फायनान्सची मुख्य कचेरी चेन्‍नई  इथे आहे. नॅशनल हाऊसिंग तिची नोंदणी  आहे. एप्रिल 2000 मध्ये ही कंपनी स्थापन झाली तिचे प्रवर्तक एक अधिकृत सहकारी सोसायटी आहे. सध्या तिच्या अकरा राज्यात आणि एका केंद्रशासित प्रदेशात 129 शाखा आहेत. आणि 31 उपकेंद्र आहे. ढळशी 2 व ढळशी 3 प्रकारच्या शहरात तिच्या बर्‍याच शाखा आहेत. श्री टी.एस. कृष्णमूर्ती हे कंपनीचे अध्यक्ष आहेत. तिचा विस्तार तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ या राज्यात प्रामुख्याने आहे. रेपको होम्स, दिवाण हाऊसिंग फायनान्सपेक्षा थोडा सरस आहे. त्यामुळे दिवाण हाऊसिंग फायनान्समधून अंशत: जरी रेपकोमध्ये अदलाबदल केली तरी गुंतवणुकीचे क्षेत्र राहून दोन्ही शेअर्सची वाटचाल पहायला मिळेल.रेपको होम्सची प्रवर्तक संस्था तामिळनाडू राज्याची एक मोठी सहकारी संस्था आहे. तिचे डिसेंबर 2017 तिमाहीचे आकडेही समाधानकारक होते. येत्या दोन वर्षात शेअरच्या उपजिनास 41 टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे 2017 चे कि/उ गुणोत्तर (20.6) जर वादळी भरले तर मार्च 2020 मध्ये शेअरचा भाव सध्याच्या दुप्पट व्हायला हरकत नाही. त्यामुळे येत्या काही महिन्यांत तो 30 टक्के तरी वाढून 800 रुपये व्हावा.

Back to top button