युलीप आणि ईएलएसएस (1) | पुढारी | पुढारी

युलीप आणि ईएलएसएस (1) | पुढारी

यंदा वर्षीच्या बजेटमध्ये इक्‍विटी फंडामध्ये मिळणार्‍या नफ्यावर 10 टक्के ‘लाँगटर्म कॅपिटल गेन टॅक्स’ चा समावेश केल्यामुळे म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीच्या परताव्याची समीकरणे काही अंशी बदलली. करबचतीसाठी एक्‍विटी सदरात मोडणार्‍या ‘इक्‍विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम’ (ईएलएसएस) वर देखील (नफ्यावर) लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आकारला जाणार असल्याने गुंतवणूकदार इतर पर्याय शोधणे स्वाभाविक आहे. अशावेळी 1 लाखापेक्षा अधिक नफ्यावर आकारण्यात येणार्‍या एलटीसीजी टॅक्स वाचवण्यासाठी गुंतवणूकदारांचा ओघ पुन्हा काही प्रमाणात ‘युलीप’ कडे वळू लागला आहे.

युलीप म्हणजे ‘ युनिट लिंक्ड एन्सुरन्स प्लॅन,’ युलीपमध्ये इएलएसएस प्रमाणेच ‘80 सी’ अंतर्गत करबचतीची सोय आहे. त्याचप्रमाणे काही अटीव शर्तीसह विमा संरक्षणदेखील मिळू शकते. युलीप ही प्रामुख्याने 5 वर्षे, 10 वर्षे, 15 वर्षे यासारख्या विविध कालावधीमध्ये उपलब्ध आहेत. युलीपसाठी कालावधी व हप्‍ता भरण्याची सरासरी तसेच संबंधित युलीपमध्ये उद‍्धृत केलेल्या  अटी व शर्ती या गोष्टी विम्याची रक्‍कम व प्रमाण बदलतात. हप्‍ता भरण्यासाठी मासिक, त्रैमासिक, सहामासिक वार्षिक अथवा एकरकमी असे पर्यायदेखील उपलब्ध आहेत ज्याप्रमाणे युलीपमध्ये युनिट प्राईस दरदिवशी बदलते.

युलीप खरेदी करताना सर्वाधिक महत्त्वाच्या तीन घटकांच्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते, ते म्हणजे. खर्च गुणोत्तर (एक्सपेंस रेशो) 2) सरेंडर, व्हॅल्यू 3) लॉक इन कालावधी वरील तिन्ही बाबींवर आपण पुढील लेखामध्ये सविस्तर प्रकाशझोत टाकणार आहोत. 

वर उल्लेख केलेल्या तीन बाबींसोबतच युलीपचा परतावा व त्यामध्ये नमूद केलल्या अटी व शर्ती सविस्तर पडताळून घेणे हे गुंतवणुकीपूर्वी ध्यानात ठेवणे श्रेयस्कर. युलीपमधील गुंतवणूक कालावधी पूर्ण झाल्यावर मिळणार्‍या रकमेवर सध्याच्या कर कायद्यानुसार कोणताही ‘लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स’ आकारला जात नाही. युलीपमधील गुंतवणूक कालावधी पूर्ण होण्याआधी गुंतवणूक धारकाचा मृत्यू ओढावल्यास युलीप खरेदी करताना नमूद केलेल्या शर्ती आणि अटीनुसार त्या गुंतवणूकदारांच्या वारसदारास ‘ठरलेली रक्‍कम’ (अ‍ॅश्युअर्ड व्हॅल्यू) मिळते.

वर उल्लेख केलल्या कोणत्याही बाबींसंबधी निर्णय घेण्यापूर्वी तवणूकदारांनी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Back to top button