ट्रेड विथ स्ट्रिक्ट स्टॉप लॉस | पुढारी

ट्रेड विथ स्ट्रिक्ट स्टॉप लॉस

भूषण गोडबोले

मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी10692अंकाला तसेच सेन्सेक्स 34969 अंकाला बंद झाला. सप्ताहअखेर शुक्रवारी सेन्सेक्सने 256 अंकांची तसेच निफ्टीने 74 अंकांची  तेजी दर्शवली.आलेखानुसार पुढील आठवड्यासाठी सेन्सेक्सची 34230 तसेच निफ्टीची 10496 ही महत्त्वाची आधार पातळी आहे.तांत्रिक विश्लेषणानुसार टेक, एसबीआय लाईफ, रिलायन्स इंडस्ट्रीज, ग्राविटा इत्यादी अनेक कंपन्यांचे शेअर्स तेजीचा आलेख दर्शवत आहेत. आलेखानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअर्सने 25 जानेवारी  2018 पासून  मर्यादित पातळ्यांमधेच चढ-उतार दर्शवून मागील आठवड्यात 991 या महत्त्वाच्या अडथळा पातळीवर 996 रु. ला बंद भाव देऊन मध्यम अवधीसाठी  तेजीचे संकेत दिले आहेत. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअर्सचा भाव जोपर्यंत 919  या पातळीच्यावर आहे तोपर्यंत  मध्यम अवधीमध्ये आणखी तेजी दर्शविणे अपेक्षित आहे.

ग्राविटा या कंपनीच्या शेअर्सचा भाव देखील जोपर्यंत 170 या पातळीच्या वर आहे तोपर्यंत तेजीचा कल दर्शवत आहे .अल्पावधीच्या आलेखानुसार  निर्देशांक तेजीचा कल दर्शवत असल्याने आगामी कालावधीसाठी मर्यादित धोका स्वीकारून आलेखानुसार तेजीचे संकेत देणार्‍या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल. मात्र मागील लेखांमधे नमूद केल्यानुसार सद्य:स्थितीमधे निर्देशांकाचे किंमत उत्पादन गुणोत्तर महाग असल्याने व्यवहार करताना पैशाचे योग्य व्यवस्थापन करणे तसेच स्टॉप लॉस तंत्राचा वापर करणे म्हणजेच ट्रेड विथ स्ट्रिक्ट स्टॉप लॉस  धोरण स्वीकारणे योग्य ठरेल.

(सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्‍लागार )

Back to top button