SBI Q4 results : ‘एसबीआय’च्या नफ्यात ४१ टक्क्यांची वाढ, प्रति शेअर ७.१० रुपये लाभांश जाहीर | पुढारी

SBI Q4 results : 'एसबीआय'च्या नफ्यात ४१ टक्क्यांची वाढ, प्रति शेअर ७.१० रुपये लाभांश जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील कर्ज पुरवठा करणाऱ्या सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीतील (SBI Q4 results) आर्थिक उलाढालीचे आकडे जाहीर केले आहेत. चौथ्या तिमाहीत SBI च्या नफ्यात ४१.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. या तिमाहीत बँकेने एकूण ९,११३ कोटी रुपयांच्या निव्वळ नफा नोंदवला आहे.

दरम्यान, एसबीआयने ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर ७.१० रुपये लाभांश जाहीर केला आहे. यामुळे बीएसईवर SBI चा शेअर्स शुक्रवारी ३.५ टक्क्यांनी वाढून ४४५.८५ रुपयांवर पोहोचला.

मागील वर्षी याच कालावधीत (SBI Q4 results) बँकेने ६,४५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला होता. यामुळे आर्थिक वर्ष २०२२ मधील निव्वळ नफा ५५.१९ टक्क्यांनी वाढून ३१,६७६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. SBI चे निव्वळ व्याज उत्पन्न (NII) या तिमाहीत १५.३ टक्क्यांनी वाढून ३१,१९८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

कर्जावरील व्याजातून मिळणारे उत्पन्न ८.६ टक्क्यांनी वाढले असल्याचे बँकेने म्हटले आहे. SBI च्या एकूण ठेवीत १०.०६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर बचत बँक ठेवीत १०.४५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मुदत ठेवी ११.५४ टक्क्यांनी वाढल्यात.

हे ही वाचा :

Back to top button