state bank of india : ‘एसबीआय’चा पाच गृहनिर्माण फायनान्स कंपन्यांसोबत करार | पुढारी

state bank of india : 'एसबीआय'चा पाच गृहनिर्माण फायनान्स कंपन्यांसोबत करार

पुढारी ऑनलाईन डेस्क :   स्टेट बँक ऑफ इंडियाने (state bank of india) पीएनबी हाऊसिंग फायनान्स, आयआयएफएल होम फायनान्स, श्रीराम हाउसिंग फायनान्स, एडलवाईस हाऊसिंग फायनान्स आणि कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स या  गृहनिर्माण फायनान्स कंपन्यांसोबत सह-कर्ज करार केला आहे. आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांनुसार सेवा न मिळालेल्या क्षेत्राला गृहकर्ज मंजूर करणे, हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे, असे एसबीआयने म्हटलं आहे.

याबाबत एसबीआयचे (state bank of india) चेअरमन दिनेश खारा यांनी सांगितले की, परवडणाऱ्या घरांची कमतरता ही भारतासाठी विशेषत: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि समाजातील अनौपचारिक वर्गांसाठी एक चिंतेचा विषय ठरला आहे. या वर्गाला अधिकाधिक गृहकर्ज मिळवून देणे, आमचे उद्दिष्ट्य आहे. आमची भागीदारी भारतातील लहान गृह खरेदीदारांना प्रभावी आणि परवडणारे क्रेडिट मिळवून देण्यास वचनबद्ध आहे. त्याचबरोबर २०२४ पर्यंत सर्वांसाठी घरे’ या सरकारच्या संकल्पनेला या करारामुळे हातभार लागणार आहे.

(state bank of india) आरबीआयने बँका आणि एचएफसीएस, एनबीएफसीएससाठी सह-कर्ज योजनेबद्दल मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. यात अर्थव्यवस्थेच्या असुरक्षित आणि कमी सेवा असलेल्या क्षेत्रांना पतपुरवठा सुधारण्यासाठी आणि कर्जदारांना परवडणाऱ्या किमतीत निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

श्रीराम हाऊसिंग फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी सुब्रमण्यन यांनी म्हटले आहे की, आरबीआयच्या २० : ८० सहकर्ज देणार्‍या मॉडेलनुसार गृहनिर्माण कर्ज ग्राहकांना संयुक्तपणे सेवा देण्यात येणार आहेत. परवडणाऱ्या घरांची मागणी प्रचंड आहे. सहकर्ज देणार्‍या मॉडेलद्वारे, आम्ही एसबीआयच्या ताळेबंद सामर्थ्याचा आणि आमच्या अंडररायटिंग क्षमतांचा फायदा घेण्याचा मानस ठेवतो.

पीएनबी हाऊसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक हरदयाल प्रसाद म्हणाले की, एसबीआयसोबतची आमची धोरणात्मक भागीदारी आमच्या किरकोळ गृहकर्ज विभागाचा एक महत्त्वाचा विस्तार आहे. आम्हाला भारतातील कामगार वर्ग आणि सेवा कमी असलेल्या समुदायांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यास सक्षम करेल. सह-कर्ज देणे हे प्राधान्य क्षेत्रातील कर्जाचे भविष्य आहे, कारण ते शेवटच्या मैलाच्या कर्जदारांसाठी वित्तपुरवठा खर्च कमी करते.

कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक राजेश शर्मा म्हणाले की, ही भागीदारी दोन्ही उपक्रमांची नफा वाढविण्यात आणि संबंधित गृहकर्ज पोर्टफोलिओचा विस्तार करण्यास मदत करेल. आम्हाला विश्वास आहे की, देशातील सर्वात मोठ्या कर्जदारासोबतच्या सहकार्यामुळे प्रत्येक क्रेडिट-पात्र कर्जदाराला गृहकर्जाच्या अधिक संधी उपलब्ध होतील. त्यांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल.

हेही वाचलंत का ? 

पाहा व्हिडिओ : महाराष्ट्र संतप्त आहे, व्यक्त होण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळालीय : केशव उपाध्ये|Kolhapur Election

Back to top button