स्मार्ट सिटीतील ई-क्लासरूमसाठी 300 प्रशिक्षकांची भरती | पुढारी

स्मार्ट सिटीतील ई-क्लासरूमसाठी 300 प्रशिक्षकांची भरती

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या माध्यमिक व प्राथमिक असा एकूण 123 शाळांमध्ये स्मार्ट सिटीच्या वतीने अद्यावत ई-क्लासरूमसाठी तयार करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांना ई-क्लासरूममध्ये शिक्षण देण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी संबंधित एजन्सीच्या वतीने 300 प्रशिक्षक नेमण्यात येणार आहेत. प्रशिक्षण तसेच, देखभालीचे हे काम 3 वर्षे चालणार आहे.

किरीट सोमय्या मुरुडला आल्यास,आम्ही रस्तावर उतरु; पर्यटन व्यावसायिकांचा इशारा !

खासगी शाळाप्रमाणे महापालिकेच्या शाळेत जागतिक दर्जाचे ई-क्लासरूम तयार करण्यात आले आहेत. त्यात संगणक कक्ष, डिजिटल ई-लर्निग प्लॅटफार्म, वायफाय एक्सेस पॉईट, एलईडी डिस्प्ले, एचडी कॅमेरे, व्हिडिओ रेकॉर्डीग, शैक्षणिक विश्?लेषणाचे सॉफ्टवेअर, रोबोटिक्स लॅब आदींचा समावेश आहे.

पालिकेच्या तब्बल 123 शाळांमध्ये ई-क्लासरूमसह संगणक, विज्ञान व गणित विभाग तयार करण्यात आले आहेत.या नव्या तंत्रज्ञानानुसार शिक्षकांना शिकविता यावे म्हणून संबंधित एजन्सीमार्फत 300 प्रशिक्षक नेमले जाणार आहेत.

Tata Harrier: टाटा हॅरिअरच्या नव्या व्हेरिएंट्स पाहिल्या का?, जाणून घ्या खास फिचर्स

हे प्रशिक्षक पालिकेच्या शिक्षकांना ई-क्लासरूमचे प्रशिक्षण देणार आहेत. तसेच, मार्गदर्शन व सहाय करणार आहेत.प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना विद्यार्थ्यांना ई-क्लासरूमच्या माध्यमातून अभ्यासक्रम घेता येणार आहे.

हे प्रशिक्षण दोन ते तीन महिने चालणार आहेत. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यांपासून पालिकेच्या सर्व शाळांमध्ये ई-क्लासरूमद्वारे शिकविले जाईल, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे.

अजित पवारांचे चिरंजीव उर्वशी रौतेलासोबत दिसल्याने चर्चांना उधाण!

एजन्सीकडून प्रशिक्षकांची नियुक्ती

स्मार्ट सिटीअंतर्गत पालिकेच्या सर्व शाळांमध्ये ई-क्लासरूम तयार करण्यात आले आहेत. तसेच, त्यासाठी आवश्यक ती सर्व सोयी व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

शिक्षकांना त्याचे प्रशिक्षण देण्यासाठी अनुभवी प्रशिक्षक नेमण्याचा करार आहे. संबंधित एजन्सी प्रशिक्षक नियुक्त करीत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पालिकेचे शिक्षक विद्यार्थ्यांना ई-क्लासरूम तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण देतील, असे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.

 

Back to top button