

मुंबई; पुढारी ऑनलाईन : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर चौफेर हल्ला केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. राज्याची प्रगती विरोधकांना दिसत नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. त्यांनी भाजपशासित मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधील आकडेवारीचा संदर्भ देत राज्यात सर्वांत कमी मद्याची दुकाने असल्याचा दावा त्यांनी केला.
रावणाचा जीव बेंबीत होता तसा काही जणांचा जीव मुंबईत गुंतलाय, द्वेषाची कावीळ बरी नव्हे असा टोला त्यांनी भाजपला लगावला.