माल पुरवण्याच्या बहाण्याने कंपनीची 65 लाखांची फसवणूक

माल पुरवण्याच्या बहाण्याने कंपनीची 65 लाखांची फसवणूक
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : माल पुरवण्याच्या बहाण्याने दोघांनी मिळून एका कंपनीची 65 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 22 सप्टेंबर 2020 ते 23 मार्च 2022 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडला.

पारसमल मोतीलाल जैन (रा. वसमत, जि. हिंगोली), किसन पंढरी थोरात (रा. असेगावपेन, ता. रिसोड, जि. वाशीम) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी राहुल राजेंद्र लटंगे (28, रा. औंध पुणे. मूळ रा. कळंब, जि. उस्मानाबाद) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या कंपनीला घडी डीटर्जंट पावडर, क्रॅकजॅक आणि पारले बिस्कीट पुरवण्याच्या बहाण्याने कंपनीचा विश्वास संपादन केला.

फिर्यादी यांनी आरोपींच्या बँक खात्यावर काही रक्कम पाठवली. त्यानंतर आरोपींनी प्रथम काही माल फिर्यादी यांच्या कंपनीला पाठवला. मात्र, त्यानंतर फिर्यादी यांच्या कंपनीकडून पैसे घेऊन त्यांना माल पाठवला नाही.

फिर्यादी यांच्या कंपनीला आरोपींबाबत संशय आल्याने कंपनीच्या टीमने आरोपींच्या पत्त्यावर भेट दिली असता आरोपींनी संगनमताने फिर्यादी यांच्या कंपनीची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.

आरोपी पारसमल याने 24 लाख 79 हजार 704 आणि आरोपी किसन याने 40 लाख 45 हजार 817 अशी एकूण 65 लाख 25 हजार 521 रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणाचा अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news