खूप वेळ उपाशी राहिलं कि तुमचीही चिडचीड होते ? मग हे जरूर वाचा | पुढारी

खूप वेळ उपाशी राहिलं कि तुमचीही चिडचीड होते ? मग हे जरूर वाचा

पुढारी ऑनलाईन : भूक लागणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येक सजीवाला उर्जेसाठी अन्नाची गरज असतेच. पण अनेकदा भूक लागूनही जेवणाची वेळ लांबत जाते. अशा वेळी तुमच्याही नकळत तुमची चिडचीड होऊ लागते. हा राग मग अनेकदा व्यक्त केला जातो. या सगळ्या गोंधळात होणारी चिडचीड भुकेमुळे होत असते हे विसरून जातो. मजेशीर बाब म्हणजे इंग्रजीमधील अँगरी (Angery ) आणि हंगर ( Hunger) या दोन शब्दांना एकत्र करून ऑक्सफर्ड विद्यापीठाने हॅंगर (Hanger) असा नवीन शब्दही त्यांच्या शब्दकोशात अॅड केला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का ? भूक लागल्यावर चिडचीड का होते?

यामागेही एक खास कारण आहे. तुम्ही खूप वेळ उपाशी राहिलात तर तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं. अशा वेळी शरीर ही गरज भरून काढण्यासाठी अँड्रेनलाईन हे संप्रेरक स्त्रवतं. यामुळे शरीर कोणत्याही अपायाला तोंड देण्यासाठी सज्ज होत असतं. पण भूक लागणे ही अपायकारक घटनांमध्ये येत नसल्याने अँड्रेनलाईनच्या अतिरिक्त उर्जेमुळे आपण चिडचिडे बनतो. या दरम्यान कार्टीसोल या हार्मोनमुळे तणाव वाढतो.

अन्न शरीरातील प्रत्येक अवयवापर्यंत आवश्यक ते पोषक घटक पोहोचवतात. त्यामुळेच काही खाल्ल्यानंतर आपला मूड ठीक होतो. तुमचीही भूक लागल्यावर चिडचीड होत असेल तर सतत काहीतरी खाऊ सोबत ठेवावा. शक्य असल्यास लगेच एनर्जी देणारे केळ्यांसारखे फळ सोबत बाळगावे.

Back to top button