डिप्रेशनमधून सुटका हवीय?, जाणून घ्‍या नवीन संशोधन काय सुचवते? | पुढारी

डिप्रेशनमधून सुटका हवीय?, जाणून घ्‍या नवीन संशोधन काय सुचवते?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नैराश्य (Depression) किंवा उदासीनता हा शब्‍द आधुनिक जीवनशैलीत आता सर्वांच्‍या परिचयाचा झाला आहे. हा जगभरातील सर्वाधिक आढळणारा मानसिक आजार म्‍हणूनही ओळखला जातो. आजवर या मानसिक आजाराला आटोक्‍यात ठेवण्‍यासाठी मोठे संशोधनही झाले आहे. ( Healthy Habits Reduce Your Depression Risk ) आता नवीन संशोधनानुसार, जीवनशैलीचा नैराश्य आटोक्‍यात ठेवण्‍यासाठी मदत करते हे स्‍पष्‍ट झाले आहे, जाणून घेवूया नवीन संशोधनाविषयी…

संबंधित बातम्‍या :

‘नेचर मेंटल हेल्थ’ जर्नलमध्ये नुकतेच प्रकाशित झालेल्या संशोधनात म्‍हटलं आहे की, केंब्रिज विद्यापीठ आणि फुदान विद्यापीठातील संशोधकांनी नैराश्‍य आणि जीवनशैली याचा विचार केला. सात निरोगी जीवनशैलीमुळे नैराश्यापासून संरक्षण हाेते. नैराश्‍याला कारणीभूत ठरणार्‍या घटकांमध्‍ये धूम्रपान, आहार, व्यायाम, झोप, बैठे काम, सामाजिक संबंध आणि मद्य सेवन यांचा प्रामुख्‍याने समावेश होतो. ट्रायग्लिसरायड्स (शरीरातील चरबीचे सर्वात सामान्य प्रकार), आणि सी-रिॲक्टिव्ह प्रोटीन तसेच मेंदूच्या संरचनेत होणारे बदल हे या संशोधनात नैराश्याच्या जैविक यंत्रणेचे सूचक म्हणून मानले गेले.

निरोगी जीवनशैलीमुळे नैराश्याचा धोका ५७ टक्‍के कमी होतो

diet for healthy and glowing skin

केंब्रिज विद्यापीठाच्या मानसोपचार विभागातील क्लिनिकल न्यूरोसायकॉलॉजीच्या प्राध्यापिका डॉ. बार्बरा जे. सहकियानयांनी ‘हेल्थलाइन’शी बोलताना सांगितले की, संशोधनात असे आढळले की, निरोगी जीवनशैलीमुळे नैराश्याचा धोका ५७ टक्‍के कमी होतो. नैराश्याचा धोका कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैली विकसित करणे ही खूपच महत्त्‍वाची गोष्ट आहे. प्रत्‍येकजण जाणीवपूर्वक यामध्‍ये बदल करु शकताे. (Healthy Habits Reduce Your Depression Risk)

सहकियान आणि तिच्या टीमने या संशोधनासाठी इंग्‍लंडमधील बायोबँकचा उपयोग केला. येथील वैद्यकीय संशोधन डेटाबेसमधील माहितीचा वापर केला. संशोधकांनी सुमारे 33,000 सहभागींच्या एमआरआय ब्रेन स्कॅनचा वापर केला गेला. तसेच 287,282 सहभागींकडील डेटा तपासला, त्यापैकी अंदाजे 13,000 लोकांना नैराश्य आले होते.

पेनसिल्व्हेनियामधील मानसशास्त्रज्ञ आणि फिलाडेल्फिया कॉलेज ऑफ ऑस्टियोपॅथिक मेडिसिन येथे मास्टर ऑफ अप्लाइड पॉझिटिव्ह सायकॉलॉजी प्रोग्रामचे संचालक डॉ. स्कॉट ग्लासमन यांनी नवीन संशाेधनाबाबत म्‍हटलं आहे की, जीवनशैलीमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. नवीन संशोधनानुसार डॉक्टर रुग्‍णांच्‍या दैनंदिन दिनचर्येमध्‍ये बदलासाठी प्रोत्साहित करतात.

निरोगी झोप ही नैराश्‍य कमी करण्‍यात सर्वात प्रभावी

Sleep better

नैराश्‍यासाठी जबाबदार असणार्‍या सात जीवनशैली घटकांपैकी, निरोगी झोपेचा सर्वात जास्त परिणाम होतो. शांत आणि गाढ झाेपेमुळे ते 22% नैराश्‍य कमी होते, असे नवीन संशोधनात आढळले आहे. धूम्रपान कमी केले तर नैराश्‍याने ग्रासण्‍याचे प्रमाण २० ते १८ टक्‍क्‍यांपर्यंत कमी होते. निरोगी आहार घेणे, अल्कोहोल (दारु) कमी करणे, नियमित व्‍यायाम आणि मध्यम वर्तन यामुळे नैराश्याचा धोका कमी होतो, असे नवीन संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे. तसेच ताण-तणाव, चयापचय आणि अगदी आपली रोगप्रतिकारक प्रणाली देखील नैराश्याच्या जोखमीवर कसा परिणाम करू शकतात यामधील जटिल संबंधांवर प्रकाश टाकतात.

आपले सर्व आरोग्य वर्तणूक आपल्या एकूण आरोग्याशी ( शारीरिक आणि मानसिक ) संबंधित आहेत. त्यांना वेगळे करणे कठीण आहे, म्हणूनच नवीन हे संशोधन मनोरंजक आहे, कारण त्याचा एकत्रित परिणाम स्‍पष्‍ट झाले आहे, असे न्यूयॉर्क विद्यापीठातील मानसोपचार विभागातील क्लिनिकल सहाय्यक प्राध्यापक. डॉ. रेचेल गोल्डमन यांनी या संशोधनाबाबत म्‍हटले आहे.

Depression Risk : आरोग्यदायी जीवनशैली कशी अंगीकारावी ?

no smoking

धूम्रपान, आहार, व्यायाम, झोप, गतिहीन वर्तन, सामाजिक संबंध आणि मद्य सेवन जीवनशैलीतील हे सात घटक लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे. तुमची निरोगी जीवनशैली तयार करण्यासाठी धूम्रपान, मद्य सेवनापासून लांब राहणे, याेग्‍य आहार, नियमित व्‍यायाम, शांत झोप घेणे, अति बैठे काम टाळणे आणि सामाजिक संबंध या सात जीवनशैली घटकांपैकी एक निवडा ज्यावर काम करा आणि हळूहळू ते सर्व सातही अनेक महिन्यांत तयार करा. निरोगी जीवनशैली नैराश्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. निरोगी जीवनशैलीची सवय लावा, असे संशोधनात सहकियान यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button