Daily Walking and Health : उत्तम आरोग्यासाठी दररोज किती पावले चालले पाहिजे? जाणून घ्या अभ्यास काय सांगतो…

Daily Walking and Health
Daily Walking and Health

पुढारी ऑनलाईन डेस्क : तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी दिवसाला १० हजार पावले चालणे, अतिशय चांगले ठरते, असे फार पूर्वीपासून बोलले जाते. परंतु, एका नवीन अभ्यासानुसार, दररोज ५ हजार पेक्षा कमी पावले चालणे देखील उत्तम आरोग्यासाठी पुरेसे ठरु शकते. जगभरातील २२६,००० हून अधिक लोकांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, रोज ४ हजार पावले चालल्यास अकाली मृत्यू होण्याचा धोका कमी होतो. हृदय आणि रक्तवाहिन्यांना फायदा होण्यासाठी फक्त २,३०० पावले चालणे पुरेसे आहे. तुम्हीजितके जास्त चालाल तितके अधिक आरोग्य फायदे दिसतील, असे संशोधकांनी सांगितले. (Daily Walking and Health)

४,००० च्या पुढे अतिरिक्त १ हजार पावले किंवा २० हजार पावलांपर्यंत चालल्यास लवकर मरण येण्याचा धोका १५ टक्क्यांनी कमी होतो. पोलंडमधील लॉर्ड्झ मेडिकल विद्यापीठ आणि अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स, विद्यापीठ -स्कूल ऑफ मेडिसीनला असे आढळले की, चालण्याचे फायदे सर्वच वयोगटातील महिला आणि पुरुषांना होतात. मात्र, सर्वांत मोठा फायदा ६० वर्षांखालील मुलांमध्ये दिसून आला आहे. (Daily Walking and Health)

लॉड्झ विद्यापीठातील प्राध्यापक मॅसीज बानाच सांगतात की, "आपण रोज चालण्यावर भर दिला पाहिजे, यावर माझा विश्वास आहे. आहार आणि व्यायामासह जीवनशैलीतील बदल, हा आमच्या अभ्यासाचा मुख्य विषय होता. दररोज चालणे हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जोखीम कमी करण्यासाठी आणि आयुष्य वाढवण्यासाठी अधिक प्रभावी ठरू शकते." (Daily Walking and Health)

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, दरवर्षी ३.२ दशलक्ष लोकांच्या मृत्यूसाठी अपुरी शारीरिक हालचाल कारणीभूत असते.
जागतिक फिटनेस कंपनीचे प्रशिक्षक हनी फाईन, जास्त बसून राहिल्याने उद्भवणाऱ्या समस्यांविषयी सांगतात. "बसून राहिल्याने तुमचे चयापचय मंद होऊ शकते. शिवाय स्नायूंच्या वाढीवर आणि ताकदीवर परिणाम होऊ शकतो. खूप वेळ बसून राहिल्याने पाठीच्या सर्व प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात, कार्यालयीन नोकऱ्या असलेल्या लोकांमध्ये हे आम्हाला खूप आढळते, की त्यांच्या पाठी सतत तणावग्रस्त संकुचित स्थितीत ठेवल्या जातात. ज्यामुळे पुढील आयुष्यात खूप समस्या निर्माण होतात." (Daily Walking and Health)

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news