Social Media and Depression : सोशल मीडियाचा अतिवापरामुळे ‘या’ मानसिक राेगाला मिळते निमंत्रण, जाणून घ्‍या नवीन संशोधनातील निष्‍कर्ष | पुढारी

Social Media and Depression : सोशल मीडियाचा अतिवापरामुळे 'या' मानसिक राेगाला मिळते निमंत्रण, जाणून घ्‍या नवीन संशोधनातील निष्‍कर्ष

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मागील काही वर्षांमध्‍ये सोशल मीडिया (समाज माध्‍यम) आपल्या जगण्यातील अविभाज्‍य घटक झाला आहे. टीव्‍ही, कम्प्यूटर आणि फोन या सर्व सुविधा एकाच माध्‍यमातून देणारा स्‍मार्ट फोन आणि आपण जीवभावाचे मित्र झालो आहोत. यातूनच सोशल मीडियाने  काहींचं जगणंच व्यापलं आहे. ( Social Media and Depression ) कोणत्‍याही गोष्‍टीचा अतिवापर हा घातकच ठरताे. त्‍याचप्रमाणे सोशल मीडियाचाही अतिवापर हा डिप्रेशन ( नैराश्‍य ) कारण ठरत आहे, असे अमेरिकेतील मेरिलने ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीच्या कॉलेज ऑफ पब्लिक हेल्थ अँड ह्युमन सायन्सेसच्‍या संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे.

सोशल मीडियाच्‍या अतिवापराने मानसिकतेवर कोणता परिणाम होतो, याबाबत मेरिलने ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीच्या कॉलेज ऑफ पब्लिक हेल्थ अँड ह्युमन सायन्सेसचे डीन ब्रायन प्रिमॅक आणि अलाबामा विद्यापीठातील कॉलेज ऑफ एज्युकेशनमधील सहाय्यक प्राध्यापक चुनहुआ काओ यांच्‍या मार्गदर्शनाखाली संशोधन झाले. हे संशोधन जर्नल ऑफ इफेक्टिव्ह डिसऑर्डर रिपोर्ट्समध्ये प्रकाशित झालं आहे.

३०० मिनिटांपेक्षा अधिक वापर ठरते उदासीनतेचे कारण

नैराश्‍यावर आजवर झालेल्‍या संशोधनात अनेक घटक जोडले गेले आहेत. सोशल मीडियाचा अतिवापर आणि नैराश्‍य
यांच्‍यातील परस्‍पर संबंध आहे. दररोज ३०० मिनिटांपेक्षा जास्‍त सोशल मीडियाचा वापर करतात ते लवकर नैराश्‍यग्रस्‍त होण्‍याची शक्‍यता दुप्‍पट असते. संशोधनात सहभागी झालेल्‍या प्रत्‍येक व्यक्तिमत्व वैशिष्ट्यासाठी, सोशल मीडियाचा वापर नैराश्याच्या विकासाशी जोरदारपणे संबंधित असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले.

एक हजार तरुणांच्‍या व्‍यक्‍तिमत्‍वाचे केले मूल्‍यांकन

या संशोधनात १८ ते ३० वयोगटातील एक हजारपेक्षा अधिक तरुणांनी सहभाग घेतला. सोशल मीडिया वापर करणार्‍यांच्‍या आरोग्‍य प्रश्‍नावली वापरुन नैराश्‍य मोजले गेले. संशोधनात सहभागी झालेल्‍यांनी दररोज किती मिनिटं सोशल मीडियाचा वापर केला, यासंदर्भात प्रश्‍न विचारले. यानंतर त्‍याच्‍या व्‍यक्‍तिमत्त्‍वाचे मोजमाप करण्‍यात आले. यातून व्‍यक्‍तिमत्‍वातील मोकळेपणा, प्रामाणिकपणा, दुसर्‍याबरोबर संवाद साधण्‍याची वृत्ती, सहमतीचा दृष्‍टीकोन याबाबतचे मूल्‍यांकन करण्‍यात आले.

Social Media and Depression :थेट संवाद खुंटल्‍याने धोका वाढला

सोशल मीडियाच्‍या अतिवापरामुळे सामाजिक तुलना स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल नकारात्मक भावना वाढवू शकते, हे स्‍पष्‍ट झाले. यातूनच नैराश्याचा धोका वाढत जातो. नकारात्‍मक भावना वाढणे मानसिक स्‍वास्‍थासाठी हानीकारक ठरते. सोशल मीडियाचा अतिवापर करणारे यांचा स्‍वत:सह सामाजिक संवाद बंद होते. लोकांबरोबर सामजिक संबंध आणि संवाद बंद झाल्‍याने गैरसमज वाढण्‍याचा धोका असतो, सामाजिक संबंध ही एक जन्मजात भावनिक गरज असते. सोशल मीडियाच्‍या अतिवापरामुळे यालाच धक्‍का बसत असल्‍याने व्‍यक्‍ती डिप्रेशनमध्‍ये जाण्‍याचा धोका अधिक वाढतो, असा निष्‍कर्ष या संशोधनात नोंदविण्‍यात आला आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button