मुलांना वारंवार ताप का येतो?, ‘ही’ लक्षणे ओळखा | पुढारी

मुलांना वारंवार ताप का येतो?, 'ही' लक्षणे ओळखा

डॉ. संतोष काळे

वारंवार येणार्‍या तापाला एपिसोडिक फिवर म्हणतात. ही समस्या पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये दिसून येते.

मुलांना वारंवार ताप का येतो?

शरीराचे तापमान दिवसा किंवा व्यायामानंतर किंचित वाढू शकते. पण ते सामान्य तापमानापेक्षा फक्त काही अंशांनीच वाढते. परंतु वारंवार येणारा ताप व्हायरल किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे किंवा हवामानातील बदलांमुळे असू शकतो. यामागे जंतुसंसर्ग, जिवाणू संसर्ग, लसीकरण अशी इतरही अनेक कारणे असू शकतात.

लक्षणे वेळेत ओळखा :

वारंवार ताप आल्याने अशक्तपणा येऊ शकतो. अशा परिस्थितीत काही लक्षणांवर नजर ठेवून तत्काळ उपचार गरजेचे ठरतात.

* तापमान -37 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त

* शरीराला थंडी जाणवते पण त्वचा उबदार वाटते.

* चिडचिडेपणा वाढणे आणि काहीही खाण्याची इच्छा न होणे.

* अंगात थकवा आणि थंडी जाणवते.

* बाळात किंवा मुलांना खूप ताप असेल तर तो मोठ्याने रडते. तसेच वारंवार कान ओढण्याची भावना त्यांच्यात निर्माण होते.

याखेरीज उलटी होणे, घशात जळजळणे, श्वासोच्छवास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी अशीही काही लक्षणे दिसतात.

वारंवार येणारा ताप देखील सामान्य तापाप्रमाणेच हाताळला जातो. या तापामध्ये भरपूर पाणी पिणे फायदेशीर ठरते. जर मुलाला ताप असेल तर त्याच्या श्वासोच्छवासाच्या पद्धतीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मुलाला श्वास घेण्यास त्रास होत असेल आणि 5 दिवस ताप येत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. यामध्ये ताप कधी आणि किती दिवस राहतो याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण हे काही आजारांचे लक्षण असू शकते. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

खबरदारी काय घ्यायची?

* पाणी उकळवून कोमट प्या.

* घर आणि परिसर स्वच्छ ठेवा.

* सूर्यप्रकाश आल्यावर एसी, कुलर चालवू नका.

* मुलांचा थंडीपासून बचाव करा.

* थंड पाणी आणि आईस्क्रीम खाणेे टाळा.

* उघड्यावरचे खाणे कटाक्षाने वर्ज्य करा.

* मुलांची प्रतिकारशक्ती तितकी मजबूत नसते, त्यामुळे मुलांमधील तापाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे ठरते.

हेही वाचा : 

Back to top button