वजन घटवा, हृदयरोग आणि मधुमेह टाळा | पुढारी

वजन घटवा, हृदयरोग आणि मधुमेह टाळा

  • डॉ. उवीं माहेश्वरी

 लठ्ठपणा हा एक आजार असून यामुळे विविध रोगांना आपसूक आमंत्रण मिळते. यात अतिरिक्त वजनामुळे हृदयरोग आणि मधुमेह होण्याची शक्यता सर्वाधिक असते. हे आजार टाळण्यासाठी वजनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वजन कमी केल्यास हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका कमी करता येऊ शकतो. याव्यतिरिक्त पौष्टिक आहाराचे सेवन करणे, नियमित व्यायाम करणे, तणावमुक्त होणे आणि पुरेशी झोप घेणेही आवश्यक आहे.

बैठ्या जीवनशैलीमुळे सध्या अनेक लोक लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत. शारीरिक हालचालींचा अभाव, खाण्यापिण्याच्या खराब सवयी आणि आनुवांशिकता यासारख्या कारणांमुळे बहुतेक लोकांचे वजन वाढू लागले आहे. अतिरिक्त वजन असलेल्यांना भविष्यात हृदयविकार, मधुमेह, पित्ताशयाच्या समस्या, यकृत आणि मूत्रपिंडाची समस्या उद्भवण्याचा धोका सर्वाधिक असतो.

हे आजार टाळण्यासाठी वजन कमी करणे, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास मदत करू शकते. हृदयाच्या समस्या दूर ठेवण्यासाठी आणि आयुर्मान वाढवण्यासाठी आरोग्यदायी सवयींचा अवलंब करायला हवा. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग हा नियंत्रित रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेमुळे होतो. एथेरोस्क्लेरोसिस नावाच्या रक्तवाहिन्या हळूहळू फुगल्या जातात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक होतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तदाब, रक्तातील साखरेची आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियमितपणे तपासून घेणे गरजेचे आहे. शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यासाठी सर्व महत्त्वाच्या पोषक तत्त्वांचा समावेश असलेला आहार घ्यायला हवा.

Back to top button