मेंदू ठेवा सुदृढ | पुढारी | पुढारी

मेंदू ठेवा सुदृढ | पुढारी

आकलन म्हणजे एखाद्या व्यक्‍तीचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन तसेच एखाद्याची कृती आणि प्रतिसादानुरूप एखाद्याचा सभोवताल आणि परिस्थिती. एखादी व्यक्‍ती जागृतावस्थेत असताना साधारणपणे प्रत्येक कृती आणि प्रतिसादात मेंदूची क्षमता आणि कार्यांच्या परिणामांचे मिश्रण असते.

आकलन क्षमता म्हणजे काय?

आकलन क्षमता म्हणजे मेंदू-आधारित कौशल्ये, ज्यांची गरज एखाद्या व्यक्‍तीला कोणत्याही गुंतागुंतरहित कामापासून अधिक गुंतागुंतीची कामे करण्यासाठी लागते. या क्षमतांचा संबंध अधिकाधिक शिकणे, स्मरण ठेवणे, ग्रहण करणे आणि समस्या सोडविणे व केवळ ज्ञान असण्यापेक्षा लक्ष केंद्रित करण्यासोबत असतो. दारावरील डोअरबेलला प्रतिसाद देणे… या सोप्या कृतीमध्ये समज समाविष्ट असते, जिथे दारावरील बेल वाजल्यावर एखाद्याला समजते की, त्याला/तिला भेटण्यासाठी कुणी तरी आले आहे. निर्णयशक्‍ती, ज्यामध्ये दार उघडावे की नाही याविषयीचा निर्णय होतो. गतिविषयक कौशल्ये ज्यामध्ये कडी सरकवून दार उघडले जाते. भाषा कौशल्ये ज्यामध्ये आगंतुकाची भाषा समजून घेणे व त्याच्यासोबत संवाद साधणे समाविष्ट असते आणि सामाजिक कौशल्ये, जिथे एखाद्याच्या आवाजाचा स्वर समजून घेतला जाऊन अन्य व्यक्‍तीसोबत संभाषण साधले जाते. 

संबंधित बातम्या

कमकुवत आकलन 

मेंदूसंबंधी अनेक आजारांमध्ये वय हा एक महत्त्वाचा घटक असतो, ज्याचा बर्‍यापैकी परिणाम मेंदूची रचना आणि कार्यावर होत असतो. जसजसे वय वाढू लागते, तसतसा मेंदूचा कमकुवतपणा वाढीला लागतो आणि त्यामागचे मुख्य कारण डिमेन्शिया हे असते. त्याचप्रमाणे वृद्धावस्थेत आढळणारे इतर आजार म्हणजे मधुमेह आणि हृदयविकार. म्हातार्‍या व्यक्‍तींकडे सर्रास आढळणार्‍या या दुखण्यामुळेदेखील आकलनाचे कार्य कमजोर होऊ शकते. तसेच औषधे, दृष्टी कमजोर असणे, कमी ऐकू येणे, झोपेची कमतरता आणि खिन्‍नतेचा मेंदूच्या कार्यावर नकारात्मक परिणाम होतो व ज्याचे पडसाद मेंदूच्या कमकुवतपणावर उमटतात. वयानुरूप होत असलेल्या आकलन र्‍हासापायी जीवनाचा दर्जा घसरतो व बाधित व्यक्‍ती तसेच त्याच्या कुटुंबाचा खर्च वाढतो.

करक्यूमीनने सर्वाधिक वैद्यकीय लक्ष वेधले आहे. वेदनाशामक औषधांसह प्रतिरोधकांच्या मिश्रणाने उपचार पद्धतीत अद्वितीय सुधारणा आणल्या आहेत, ज्यामुळे पहिल्या दमात फोल ठरणार्‍या औषधांकडून आता चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 

त्याशिवाय व्यक्‍तींना अल्प आकलन दोष (एमसीआय) सतावतो, ज्यामुळे विचार कौशल्ये आणि स्मरणासह आकलन क्षमता कमकुवत होतात. यामुळे अल्झायमर किंवा डिमेन्शिया होण्याची जोखीम बळावते. करक्यूमीनच्या 400 एमजी प्रमाणामुळे स्मरणशक्‍तीत वाढ होऊन, वृद्ध व्यक्‍तींचा मूड चांगला राहतो. आहारात हळदीत हा घटक आढळतो; मात्र तो अपुरा असल्याने पाईपराईनसोबत 400 एमजी करक्यूमीन सेवन केल्यास व्यग्रता वाढते. अमेरिकन जर्नल ऑफ जेरियाट्रिक सायकियास्ट्रीच्या ताज्या अहवालानुसार करक्यूमीन मेंदूला संरक्षित करत असल्याचा पुरावा मिळतो. 

करक्यूमीन जादुई घटक 

भारतात हळदीचा वापर मसाला आणि औषधी वनस्पती अशा दोन्ही प्रकारे केला जातो. हळदीमध्ये करक्यूमीनचे मोठ्या प्रमाणावर बायोअ‍ॅक्टिव्ह कपाउंड असते. ज्यामुळे एक रोगनिवारक म्हणून करक्यूमीन अधिक खास ठरतो. अभ्यासाने सिद्ध केले आहे की, करक्यूमीन हे एकप्रकारचे अँटिऑक्सिडेंट आहे. जे आपल्या पेशींचा मुक्‍त मूलगामींपासून बचाव करते. तसेच यामध्ये बळकट दाहशामक घटक आढळतात. 

हळदीला चकाकदार सोनेरी रंग या करक्यूमीनमुळे प्राप्त होतो आणि त्यात आरोग्यवर्धक प्रभावीपणा यामुळे उतरतो. ते मेंदूला चालना देते आणि त्याचे रक्षण करते. करक्यूमीन पुरकामुळे एखाद्याचा मूड सुधारतो, तणाव आणि चिंता यावर नियंत्रण येते. त्याशिवाय, वाढते वय आणि मनोदशेसंबंधी आजारांपासून बचाव होतो.

मेंदूमधील न्यूरोनचे आरोग्य राखून मेंदूचे कार्य सुरळीत करणारे करक्यूमीन हे नैसर्गिक आरोग्य पूरक असल्याचे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. बीडीएनएफ (मेंदूत तयार झालेला न्यूरोट्रोफिक घटक) हे विशिष्ट हार्मोन वाढीसाठी महत्त्वाचे असणारे हार्मोन आहे, जे मेंदूला चालवते. मेंदूचे काही विकार जसे की, अल्झायमरमध्ये बीडीएनएफची पातळी कमी होणे. करक्युमीनमध्ये बीडीएनएफची पातळी वाढविणारे घटक आहेत, जे सुधारित आकलन शक्‍तीला आधार देतात. हे मेंदूंच्या पेशींचा बचाव करणारे एक बळकट प्रतिरोधक आहे. करक्यूमीन काही मार्गांनी मेंदूचे संवर्धन करते, त्याचे रक्षण करते. ते संपूर्णपणे नैसर्गिक आणि जैविक आहे.

Back to top button