बॅडमिंटन खेळा, तंदुरुस्त राहा | पुढारी | पुढारी

बॅडमिंटन खेळा, तंदुरुस्त राहा | पुढारी

वजन कमी करायचे आहे किंवा शरीरातील जादाची चरबी घटवायची असेल तर बॅडमिंटन रोज खेळणे फायदेशीर ठरते. 

बॅडमिंटन खेळताना धावणे, पळणे, उड्या मारणे, सूर मारणे आणि हात आणि पाय वेगाने हलवले जातात. या प्रक्रियेत संपूर्ण शरीराला उत्तम व्यायाम होतो. शरीरात जमा झालेली चरबी कमी होऊ लागते. एक तास बॅडमिंटन खेळून तब्बल 450-500 कॅलरीजपर्यंत चरबी घटू शकते. रोज तीस ते चाळीस मिनिटे बॅडमिंटन खेळल्यास स्नायू मजबूत होतात आणि शरीराची ठेवण चांगली राहते. सतत धावणे, पळणे, उड्या मारणे आणि हात-पाय यांची हालचाल झाल्याने स्नायूंचा आकार चांगला होतो. त्यामुळे खांदे आणि हात मजबूत होतात. 

आपल्या शरीरात मेंदूनंतर 3 महत्त्वाचे अवयव असतात ते म्हणजे यकृत, मूत्रपिंड आणि हृदय. बॅडमिंटन खेळताना शरीरातील रक्‍ताभिसरण उत्तम होत असल्यामुळे या अवयवांपर्यंत ऑक्सिजनयुक्‍त रक्‍त पुरेशा प्रमाणात पोहोचते. बॅडमिंटन खेळल्याने हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. कारण, धमन्यांमध्ये जमा झालेले प्लाक निघून जाते. 

संबंधित बातम्या

हल्लीची जीवनशैली धावपळीची झाली आहे. त्यामुळे बहुतेकांच्या आयुष्यात तणाव असतो. बॅडमिंटन खेळताना आपण शारीरिकच नव्हे तर मानसिक रूपाने कार्यशील होतो. बरोबरच्या खेळाडूला डिफेंड करणे आणि उत्तम शॉट मारण्यासाठी मेंदूचा वापर करावा लागतो. त्याशिवाय, वेगवान शारीरिक हालचालीही होतात. त्यामुळे मेंदूत ऑक्सिजनयुक्‍त रक्‍ताचा प्रवाह वेगवान होतो. त्यामुळे मेंदूचे स्नायू शिथिल होतात आणि मानसिक तणाव कमी होतो. बॅडमिंटन खेळल्याने आपली हाडे मजबूत होतात. शारीरिक हालचालीमुळे हाडांची निर्मिती होणार्‍या पेशी विकसित होतात.  

Back to top button