स्त्रियांच्या पाळीतील तक्रारी PCOD | पुढारी | पुढारी

स्त्रियांच्या पाळीतील तक्रारी PCOD | पुढारी

डॉ. सौ. सपना गांधी

किशोरवयीन मुलींपासून ते स्त्रियांपर्यंत म्हणजेच मासिक धर्म चालू झाल्यापासून ते रजोनिवृत्तीच्या कालावधीत स्त्रियांना पाळीच्या बर्‍याच तक्रारी असतात.

PCOD म्हणजेच अबनॉर्मल गाठ. ही स्त्रियांच्या अंडाशयाला तयार होते. त्यामुळे अनियमित पाळी व कधी कधी 5-6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त पाळी तडावते. वजन वाढते. हनुवटी, गालावर व ओठांच्या वरील बाजूस नको असलेले केस येणे, पाळीमध्ये ओटीपोटात खूप दुखणे, असह्य वेदना होणे, पुरुषी हार्मोन अँड्रोजनचे प्रमाण वाढलेले असते.

PCOD ची प्रमुख कारणे म्हणजे हार्मोनल डिसबॅलन्स होणे. स्ट्रेस, टेन्शन, काळजी-चिंता, अनियमित खाण्याच्या सवयी, कधी कधी आनुवंशिकता ही महत्त्वाची असते. आजूबाजूच्या वातावरणाचाही शरीर मनावर इफेक्ट होत असतो.

PCOD ची प्रामुख्याने लक्षणे म्हणजे ते प्रत्येक स्त्रीनुसार वेगवेगळी असू शकतात. काहींना तर PCOD ची लक्षणेच जाणवत नाहीत. तर काहींची Oily Skin पिंपल्स सारखे सारखे येत राहतात. अनियमित पाळी किंवा पाळी अजिबातच येत नाही. महिनोन्महिने, नको तिथे नको असलेले केस येत राहणे (पुरुषी हार्मोन वाढल्याने), वजन वाढणे, काही महिलांमध्ये अबॉर्शन होणे किंवा मूल अजिबातच न राहणे. कारण, अनियमित बीज निर्मिती असते, वेलव्हेट प्रकारचे पॅचेस स्कीनवर येत राहतात. PCOD च्या महिलांमध्ये डिप्रेशनचे प्रमाण जरा जास्तच असण्याची शक्यता असते. कारण, हार्मोनल डिसबॅलन्स असतो. कधी तर डँड्रफ होते. बी. पी. वाढणे हेही लक्षणे दिसतात. PCOD हे डायग्नोसीस करण्यासाठी सोनोग्राफी व ब्लड टेस्ट उपयोगी पडतात.

Androgen चे रक्तातील प्रमाण वाढणे व वरील लक्षणांची जाणीव झाली तर PCOD हे कन्फर्म असे समजावे. शिवाय, USG मध्ये अंडाशयाला एक किंवा अनेक गाठी दिसणे, असणे हेही PCOD चे निदान करण्यासाठी उपयुक्त ठरते.

होमिओपॅथिक उपाययोजनेबरोबरच खाण्यापिण्यातून समतोल व सकस आहार, भरपूर पालेभाज्या व फळे, प्रोटीन व कॅल्शियमचे योग्य शरीरातील प्रमाण राहणे फार महत्त्वाचे आहे.

होमिओपॅथिक औषधोपचार हे पूर्ण उपचार पद्धती आहे. कसलेही इंजेक्शन/ऑपरेशन न करता, नैसर्गिक पद्धतींनी आपल्या शरीरातील दोष कमी होऊन रुग्णाला पूर्णपणे PCOD पासून मुक्त करता येते. म्हणूनच, होमिओपॅथिक औषधे ही शास्त्रशुद्ध पद्धतीनीच व सर्व प्रिन्सीपल्स व त्या त्या Personality नुसार कॉन्स्टिट्युशनल औषध कमीत कमी मात्रेत जर दिले गेले तर ते मन व शरीर सक्षम बनवण्यास व प्रतिकार शक्ती वाढविण्यास उपयोगी होते व पेशंट रोगमुक्त PCOD मुक्त होऊन त्याच्या पाळीच्या तक्रारी नाहीशा होतात व ज्यांना मूल राहत नाही, त्यांनाही मूल राहण्यास फायदा होतो.

खालील काही होमिओपॅथिक औषधे आहेत, त्या फक्त होमिओपॅथिक डॉक्टरांकडूनच घ्याव्यात.

1) एपीस मेल (Apis Mel) – या प्रकारचे रुग्ण पोटदुखीने त्रस्त झालेले असतात. टोचल्यासारखे दुखत असते. पाळी तडावलेली असते. ती कधी कधी मेडिकलच्या हार्मोन्सच्या गोळ्या घेतल्याशिवाय येतच नाही. सर्वांगावर सूज असते. वजन वाढलेले असते. डोळ्यांखालीपण सूज असते. अंडाशय व पिशवीवर सूज येऊन पाळीत खूप त्रास होतो. अंडाशयाच्या दोन्ही बाजूंना Cyrt  असू शकते.

या प्रकारातील मुली व स्त्रिया मेहनती व कष्टाळू असतात. कुठलेही काम मन लावून करतात. कधी कधी ईर्षाभावही असतो. अस्वस्थता येते, विधवा स्त्रियांमध्ये जास्त करून दिसून येते.

2) कोलोसिंथ (Colocynth) – पोटदुखी प्रचंड असते की, PCOD चे रुग्ण खूपच पोटदुखींनी हैराण झालेले असतात. पोटात क्रॅम्प येतात. अनियमितपणा पाळीमध्ये येतो.

3) काली बीच (Kali Bich) – एका ठरावीक ठिकाणी दुखावा असतो की, जो एका बोटानेही कव्हर करू शकेल आणि सारखे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी असे दुखावा होत राहतो. यांच्यामध्ये पित्ताचा त्रासही असतो. PCOD हे डाव्या बाजूचे असते. यातील स्त्रिया खूप हट्टी असतात. यांचे पाळीतील स्राव खूप चिकट, तार धरतात इतके चिकट असतात.

4) लॅकेसीस (Lachesis) – स्त्रियांच्या पाळीमध्ये अनियमितता तर असतेच त्याचबरोबर काळपट, घट्ट Bleeding चा त्रास होत आणि प्रमाणात होत असते. डावी PCOD असून पोटदुखी खूप असते. स्त्रिया या उष्ण प्रकृतीच्या असून खूप चंचल, हुशार, बुद्धिमान असतात. वेळप्रसंगी बदल/सूड घेण्यास कमी करत नाहीत. ईर्षा असते. हार्मोनल डिस्टर्बन्स असतो. शक्यतो मेनोपॉजच्या काळात त्रास होत असतो.

5) सिलिसीया (Silicea) – या मुली/स्त्रिया हुशार, सिन्सियर, अभ्यासू अशा असतात. शिवाय आज्ञाधारकही असतात. पाळीतले बिघाड, अनियमितता, आनुवंशिकता असते. PCOD ला उत्तम औषध आहे. थंड प्रकृतीच्या असून घशाचा/फुफ्फुसाचा विकार होऊ शकतो.

6) पोडोफायलम (Podophyllum) – मानसिक ताणतणाव, विचार, भावनिक चढउतार, ही कारणे PCOD ची असतात. स्नायूंचे शिथिल असतात. त्यामुळे शौचास गेल्यास जागा व पिशवी बाहेर येत असते. पोटदुखी ही पोटावर झोपल्यावर बरे वाटते. जुलाबही बरे होतात.

7) थुजा (Thuja) – हे औषध अंडाशयातील गाठीवर तर उपयोग पडतेच; परंतु शरीरात अशा कुठेही गाठी होत राहतात. अशा स्त्रियांना आयुष्य जगण्यात इंटरेस्ट नसतो. आत्मविश्वासाचा अभाव झालेला असतो. लसींचे साईड इफेक्ट होतात. या स्त्रियांना ठरावीक फिक्स असे मत असतात. तसे भास होतात. थोडा भांडखोर प्रवृत्ती असते.

8) आयोडम (Iodum) – उष्ण प्रकारच्या स्त्रिया PCOD चे मुख्य कारण थायरॉइड ग्रंथीचे विकार, हार्मोनल डिस्टर्बन्स इ. खूप भूक लागते. खाल्ले तरी परत परत सारखे सारखे खावसं वाटतं. उजव्या बाजूस PCOD मध्ये उपयोगी पडते.

Back to top button